बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ 'प्रस्थानम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १२ वर्षानंतर जॅकी श्रॉफ व संजय दत्त एकत्र रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहे. जॅकी श्रॉफ असा अभिनेता आहे जो अभिनेता झाल्यानंतरही चाळीत राहत होते आणि चाळीत लाईन लावून बाथरूमला जात होते.
जॅकी श्रॉफ यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ते आताही तीन बत्तीतील ते राहत असलेल्या चाळीतील घरी जातात, त्यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले की, मी अजूनही माझ्या चाळीतल्या घरी जातो. कारण मी तिथे बरेच वर्षे राहिलेलो आहे. हिरो बनल्यानंतरही राहिलो आहे. टॉयलेटला जाण्यासाठी लाईनमध्ये उभा रहायचो डब्बा पकडून. निर्माते येऊन बसत होते आणि मी बोलायचो बाथरूमला जाऊन येतो. टॉयलेट बाहेर होते. त्यामुळे लाईन लागत होती. तीस लोक होते आणि सात खोल्या होत्या. सात खोल्या पार करून जावं लागत होतं. जेव्हा तुम्हाला माहित आहे की तुम्ही ते जीवन व्यतित केलं आहे. मग काय झालं. मी विचार केला नव्हता की चाळीत राहून डब्बा पकडून मी हिरो बनेन.
संजय दत्त, जॅकी श्रॉफ, मनीषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'प्रस्थानम' या चित्रपटाला राजकीय पार्श्वभूमी आहे. हा चित्रपट तेलगू सिनेमा ‘प्रस्थानम’चा हिंदी रिमेक आहे.