Join us

प्रेम, सन्मान अन्...; जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट' मधील देशभक्तीची भावना जागृत करणारं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:38 IST

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

John Abraham Diplomat Movie Song:  बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हा इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. जॉन सध्या त्याचा आगामी चित्रपट द डिप्लोमॅटमुळे चर्चेत आहे. पठाण तसेच वेदा नंतर अभिनेता लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच द डिप्लोमॅट सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला. त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा टीझर पाहून प्रेक्षकांना आता जॉनच्याया चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. नुकतंच या चित्रपटाती नवीन गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं सुद्धा सध्या ट्रेंडिगवर आहे. 

नुकतंच 'द डिप्लोमॅट' मधील देशभक्तीची भावना जागृत करणारं भारत हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ने सोशल मीडियावर या गाण्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या गाण्यामध्ये काळजाचा ठोका चुकवणारे अनेक प्रसंग बघायला मिळतात. दरम्यान, प्रसिद्ध गायक हरिहरन यांनी 'भारत' या गाण्याला आपला सुरेल आवाज दिला आहे. तर ए.आर. रहमान या चित्रपटाचे संगीतकार आहेत. तसेच त्यातील गाणी मनोज मुंतशीर यांनी लिहिली आहेत. 

जॉन अब्राहम या सिनेमात डिप्लोमॅट अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारीत आहे. शिवम नायर दिग्दर्शित हा चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहमसह रेवथी, कुमुद मिश्रा आणि शरीब हाश्मी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर टी सीरिज, जेए एंटरटेनमेंट, फॉरच्युन पिक्चर्स आणि वकाऊ फिल्म प्रॉडक्शन यांनी सिनेमाची निर्मिती केलीय. 

टॅग्स :जॉन अब्राहमबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा