Join us

गणपती बाप्पा मोरया! 'भूल भूल्लैया-३' च्या यशासाठी अभिनेता कार्तिक आर्यन सिद्धीविनायकाच्या चरणी लीन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 4:41 PM

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'भूल भूलैल्या-३' नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Bhool Bhulaiyaa 3 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) बहुप्रतीक्षित चित्रपट 'भूल भूलैल्या-३' (Bhool Bhulaiyaa 3) नुकताच प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या शुभ मुहू्र्तावर १ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान चित्रपटाच्या यशासाठी अभिनेत्याने बाप्पाकडे साकडं घातलं आहे. चित्रपट रिलीज होताच कार्तिक आर्यन सिद्धीविनायकाच्या चरणी लीन झाला आहे. चित्रपटाच्या यशासाठी अभिनेत्याने गणरायाकडे प्रार्थना करताना दिसतोय.

'भूल भूलैल्या-३' चित्रपट पडद्यावर येताच प्रेक्षकांसहीत सेलिब्रिटींनाही चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्याने त्याच्याकामातून वेळ काढत बाप्पाचा आशीर्वाद घेण्यास पोहोचला आहे. त्यावेळी अभिनेत्याने दोन्ही हात जोडून सिद्धीविनायकच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळतोय. "Thank you Bappa for My biggest Friday" असं कॅप्शन देत अभिनेत्याने त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

'भूल भूलैल्या-३' प्रदर्शित होताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षित, विद्या बालन,तृप्ती डिमरी, राजपाल यादव यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळतेय. जवळपास १५० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर चालणार की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :कार्तिक आर्यनमाधुरी दिक्षितविद्या बालनतृप्ती डिमरीबॉलिवूडसेलिब्रिटी