Join us

"मी खूप नर्व्हस होतो...", 'भुल भूलैय्या-३' अन् 'सिंघम अगेन'च्या क्लॅशवर अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 11:22 IST

कार्तिक आर्यनच्या 'भुल भूलैय्या-३' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

Kartik Aaryan :कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भुल भूलैय्या-३' (Bhool Bhulaiyaa 3) आणि अजय देवगण स्टारर 'सिंघम अगेन' (Singham Again) हे दोन बिग बजेट सिनेमे गेल्या वर्षी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले. प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी धमाका केला. तर 'भुल भूलैय्या-३'  या चित्रपटाने जवळपास २६० कोटींहून अधिक कमाई केली. ऐन दिवाळीत हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्याने त्याच्यांमध्ये कमालीची टक्कर पाहायला मिळाली. त्याचा परिमाण हा कळत नकळतपणे चित्रपटांच्या व्यवसायावर झाला. यावर आता अभिनेता कार्तिक आर्यनने भाष्य केलं आहे. शिवाय दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यामुळे  आपल्याला टेन्शन आलं होतं, असंही त्याने म्हटलं आहे. 

'द इंडियन एक्सप्रेस'च्या 'स्क्रीन' शोमध्ये कार्तिक आर्यनने हजेरी लावली. दरम्यान 'भुल भूलैय्या-३' आणि 'सिंघम अगेन'च्या क्लॅशवर अभिनेता स्पष्टपणे बोलला. त्यावेळी कार्तिक म्हणाला, "सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली यामुळे आम्ही टेन्शन फ्री झालो. पण, जेव्हा हा चित्रपट रिलीज होणार होता त्यावेळी मी खूप नर्व्हस होतो. याचं कारण म्हणजे हा एक बिग बजेट सिनेमा होता. सुरुवातीला हा एकच सिनेमा रिलीज होणार असल्यामुळे मी खुश होतो. कारण हा एक कॉमेडी सिनेमा होता. ज्यामुळे तो लोकांना नक्कीच आवडेल, असं वाटत होतं."

पुढे अभिनेता म्हणाला," जेव्हा कळालं की हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहेत, त्यानंतर धाकधुक वाढू लागली. प्रत्येकजण विचारात पडला होता. रिलीजच्या पहिल्याच दिवशी असं वाटलं जणू ही माझा पहिलाचा चित्रपट रिलीज होत आहे. त्यानंतर जेव्हा चित्रपट चालला तेव्हा आमचं टेन्शन दूर झालं, आमच्या अडीच वर्षाच्या मेहनतीचं फळ मिळालं.

चित्रपटाच्या क्लॅशवर कार्तिक आर्यनचं स्पष्ट मत

चित्रपटाच्या क्लॅशवर बोलताना कार्तिक आर्यन म्हणाला,"सिंघम अगेन' आणि 'भुल भूलैय्या-३' या चित्रपटांच्या कथा भिन्न होत्या. एक अॅक्शनपट होता तर दुसरा हॉरर कॅामेडी. मला वाटतं दोन्ही चित्रपटांसाठी थिएटर्स उपलब्ध होते. हे सिनेमे रिलीज झाले तेव्हा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच होती. पण, दिवाळी ऐवजी तेव्हा इतर कोणत्याही दिवशी हे चित्रपट रिलीज झाले असते तर त्याचा परिणाम वेगळाच दिसला असता. दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी स्क्रीन्स उपलब्ध होत्या आणि लोक चित्रपट पाहण्याच्या मुडमध्ये होते. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा समतोल राखता आला." 

टॅग्स :कार्तिक आर्यनअजय देवगणबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा