बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान(केआरके) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. बॉलिवूडप्रमाणेच समाजातील अनेक घडामोडींवर केआरके अगदी परखडपणे त्याचं मत ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतो. अनेकदा केआरकेच्या ट्वीटमुळे वादही निर्माण झालेला आहे. सध्या केआरकेच्या अशाच एका ट्वीटची चर्चा रंगली आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींवर केआरकेने ट्वीट केलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांसह बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचं चित्र आहे. परंतु, राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं केआरकेचं म्हणणं आहे. केआरकेने याबाबच केलेलं ट्वीट चर्चेत आहे. "NCP मध्ये कधीच फूट पडली नव्हती आणि पडणारही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता आणि एकच राहील. फक्त बॉसच्या स्पेशल फॉर्म्युलानुसार सगळं काही होत आहे," असं केआरकेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. केआरकेच्या या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
“गावात थिएटर नसल्याने बायका बैलगाडीतून...”, ‘बाईपण भारी देवा’ फेम शिल्पाने सांगितला अनुभव
दरम्यान, अजित पवारांसह त्यांच्या गटातील नेत्यांनी सोमवारी१७ जुलै) दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरज पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांच्याबरोबर कसा जाऊ? असं विधान शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना केलं.