Join us

मनोज वाजपेयींचा जुना व्हिडीओ व्हायरल, सोबतीला फिल्मी इंडस्ट्रीतले दोन मोठे कलाकार! तुम्ही ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 10:42 AM

मनोज वाजपेयींचा त्यांच्या जुना नाटकातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय (manoj bajpayee)

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची सुरुवात नाटक आणि रंगभूमीपासून झालीय. आज जरी बॉलिवूडमधील अनेक कलाकार सुपरस्टार होऊन त्यांना ओळख मिळाली असली तरीही या कलाकारांचा सुरुवातीचा काळ सुद्धा विलक्षण होता असं म्हणायला हरकत नाही. बॉलिवूड कलाकरांच्या जुन्या दिवसांची आठवण करुन देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओत मनोज वाजपेयी थिरकताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत सध्याचे बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकारही पाहायला मिळत आहेत.

मनोज वाजपेयींचा जुना व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ ३३ वर्ष जुना आहे. या व्हिडीओत मनोरंजन विश्वातील तीन आघाडीचे कलाकार अभिनय करताना दिसत आहेत. यातील निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे मनोज वाजपेयी. याशिवाय हातात हार्मोनियम घेऊन गाणं गाताना पियुष मिश्रा दिसत आहेत. या दोघांसोबत गाण्याची साथ देताना मागे अभिनेते ऋतुराज सिंह पाहायला मिळत आहेत. 

व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रिया

१९९१ साली 'सुनो रे किस्सा' या नाटकात या तिघांनी काम केलं होतं. आज पियुष मिश्रा आणि मनोज वाजपेयी दोघेही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार आहेत. या दोघांच्या साथीला असलेले अभिनेते ऋतुराज सिंह यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. ऋतुराज यांनी टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करुन या मालिका चांगल्याच गाजवल्या.  आहेत. मनोज वाजपेयी लवकरच 'फॅमिली मॅन ३' वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. याशिवाय पियुष मिश्रा सध्या त्यांच्या गाण्यांचं लाईव्ह कॉन्सर्ट टूर जगभरात करत आहेत.

टॅग्स :मनोज वाजपेयीबॉलिवूड