Join us

अक्षय कुमार नाही तर 'या' अभिनेत्याचे 77 चित्रपट झाले फ्लॉप, तरीही चाहते मानतात सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2023 11:37 AM

अभिनेत्याच्या करिअरमध्ये तब्बल 180 चित्रपट फ्लॉप ठरले.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) एका वर्षात सर्वाधिक चित्रपट करण्यासाठी ओळखला जातो. यातील काही चित्रपट फ्लॉप होतात तर काही सुपरहिट होतात. मध्यंतरी अक्षयचे सलग 16 सिनेमे फ्लॉप झाले होते. तो काळ त्याच्यासाठीच खूप संघर्षाचा होता. पण तुम्हाला माहितीए का सर्वाधिक फ्लॉप चित्रपट देणारा अभिनेता अक्षय नाही तर दुसराच एक स्टार आहे. तो अभिनेता म्हणजे मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty).

12 वर्षात 77 चित्रपट फ्लॉप

'डिस्को डान्सर' म्हणून ओळख असलेले मिथुन दा यांनी करिअरमध्ये सर्वात जास्त फ्लॉप सिनेमे दिले आहेत. त्यांचे तब्बल 180 चित्रपट फ्लॉप ठरले. यापैकी 47 चित्रपट तर जोरदार आपटले. डीएनएच्या रिपोर्टनुसार, मिथुन चक्रवर्ती यांनी ५० पेक्षा जास्त हिट चित्रपट केले. काही चित्रपट तर आयकॉनिक ठरले. यामध्ये 'डिस्को डान्सर','द काश्मीर फाईल्स','प्यार झुकता नही' सारख्या काही सिनेमांचा समावेश होतो. त्यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान त्यांनी 12 वर्षात तब्बल 77 फ्लॉप चित्रपट दिले.

मिथुन यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1976 साली 'मृगया' या सिनेमातून केली. तर 1980 साली ते डान्सिंग स्टार म्हणून उदयास आले. यानंतर त्यांनी सिनेमांमध्ये दमदार अॅक्शन, डान्स आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 1995 साली त्यांचा 'रावणराज' सिनेमा सुपरहिट ठरला होता. पण यानंतर त्यांच्या करिअरचा वाईट काळ सुरु झाला. 1995 नंतर 2007 साली आलेल्या 'गुरु' सिनेमापर्यंत त्यांनी एकही हिट फिल्म दिली नाही.

5 वर्षात 33 चित्रपट फ्लॉप

रिपोर्टनुसार, मिथुन चक्रवर्ती यांचे 1993 ते 1998 दरम्यान एकामागे एक 33 सिनेमे फ्लॉप झाले. त्यांना शेवटचं काश्मीर फाईल्समध्ये पाहिलं गेलं. तर आता ते विवेक चौहान यांच्या 'बाप' सिनेमात दिसणार आहेत. ही फिल्म याचवर्षी रिलीज होणार आहे. कालच त्यांच्या आई शांतिरानी चक्रवर्ती यांचं निधन झालं. तर तीनच वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. सध्या मिथुन दा 'डान्स बांगला डान्स' शोमध्ये जज आहेत.

टॅग्स :मिथुन चक्रवर्तीअक्षय कुमारसिनेमाबॉलिवूड