Join us

नील नितीन मुकेश आडनावाऐवजी वडिलांचं नाव का लावतो? पहिल्यांदाच सांगितलं त्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 18:29 IST

Neil nitin mukesh: अलिकडेच एका मुलाखतीमध्ये नीलने त्याचं आडनाव सांगितलं आहे. सोबतच तो आडनावाऐवजी वडिलांचं आणि आजोबांचं नाव का लावतो हे सुद्धा सांगितलं आहे.

बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे नील नितीन मुकेश (neil nitin mukesh). उत्तम अभिनयकौशल्य आणि स्मार्टनेस यांच्या जोरावर नील अल्पावधीत लोकप्रिय झाला. नीलने त्याच्या करिअरमध्ये फार मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्याचा कलाविश्वात म्हणावा तसा दांडगा वावर नाही. यात बऱ्याचदा त्याच्या सिनेमांसोबतच त्याच्या नावाचीही चर्चा होते. नील त्याच्या नावापुढे वडिलांचं आणि आजोबांचं नाव लावतो. त्यामुळे तो आडनाव का लपवतो असा प्रश्न अनेकांना पडतो. अलिकडेच एका मुलाखतीत त्याने यामागचं कारण सांगितलं आहे.

नील त्याच्या नावापुढे वडिलांचं आणि आजोबांचं नाव का लावतो हे अनेकांसाठी कोडं होतं. परंतु, हे कोड त्यानेच उलगडलं आहे. विशेष म्हणजे असं नाव लावण्यामागेही एक खास कारण असल्याचं त्याने सांगितलं. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवर त्याचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

"आजच्या सोशल मीडियावर अनेक जण माझ्या नावाची मस्करी करतात. तुझ्या वडिलांनी तुझं एकच नाव का ठेवलं नाही? असा प्रश्नही काही जण विचारतात. पण, या नावामागेही एक भावनिक गोष्ट आहे. माझं खरं नाव नील माथुर असं आहे. माझ्या आजोबांच्या निधनानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्या नावापुढे आजोबांचं नाव लावायला सुरुवात केली.  त्यामुळे माझंही कर्तव्य आहे की मी माझ्या वडिलांना कायम माझ्यासोबतच घेऊन पुढे जाऊ. आणि, लोकांनाही कळावं की मी कोणत्या कुटुंबातला मुलगा आहे", असं नीलने उत्तर दिलं.

दरम्यान,  नीलच्या आजोबांचं नाव मुकेश असं असून त्याचे वडील नितीन मुकेश असं नाव लावतात. त्यांचंच पाहून नीलने त्यांचं अनुकरण केलं आहे. म्हणूनच आज तो नील नितीन मुकेश असं नाव लावतो. नीलने आतापर्यंत 'प्रेम रतन धन पायो', 'आ देखें जरा', 'शॉर्टकट रोमियो', 'साहो' अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :नील नितिन मुकेशबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा