Join us

फ्लॉप सिनेमे देऊनही मानधनात वाढ करायचा, पडद्यावर एन्ट्री होताच थिएटर जायचं दणाणून, हा अभिनेता आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 3:48 PM

हिंदी सिनेसृष्टीत असे काही कलाकार होऊन गेले ज्यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

Raj Kumar Fees : हिंदी सिनेसृष्टीत असे काही कलाकार होऊन गेले ज्यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीत फ्लॉप सिनेमे देऊनही या अभिनेत्याच्या करिअरवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. कोण आहे हा अभिनेता पाहूयात... 

जानी... हा शब्द कानावर पडला तर पहिल्यांदा अभिनेते राजकुमार यांचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. राजकुमार हे हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे. सुटाबुटात मोठ्या रुबाबात पडद्यावर एंट्र्री करत लाखो- चाहत्यांची त्यांनी मनं जिंकणाऱ्या हा नायकाच्या अभिनयाला तोड नाही. पडद्यावरचा त्यांचा दमदार आवाज, त्यांची अनोखी अ‍ॅक्टिंग स्टाइल आणि डायलॉग आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत.

अभिनेते राज कुमार यांनी त्यांच्या सिनेप्रवासात जवळपास ७० पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं. पण त्यावेळी जर त्यांचा एखादा सिनेमा पडद्यावर फ्लॉप ठरला तर हा राजकुमार आपल्या मानधनात वाढ करायचे. 

एका मुलाखतीत दरम्यान ते म्हणाले, 'मला आठवतंय की जेव्हा माझा एक चित्रपट फ्लॉप झाला तेव्हा मी माझ्या मानधनात एक लाख रुपयांनी वाढ केली. माझ्या सेक्रेटरीने मला याबाबत विचारलं, 'राज साहेब, चित्रपट फ्लॉप झालाय आणि तुम्ही फी मध्ये एक लाख रुपयांनी वाढवताय? .' त्यावर मी उत्तर दिलं, पिक्चर हिट होवो किंवा नाही, मी अभिनयात  नापास झालो नाही, त्यामुळे माझ्या मानधनात एक लाख रुपयांची वाढ होईल. हे वास्तव मी सांगत आहे.

"माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले याची मला अजिबात खंत नाही, कारण मला माहित आहे की स्क्रिप्ट चांगली नसल्यामुळे चित्रपट फ्लॉप झाले आहेत. पण मी माझी प्रत्येक भूमिका चोखपणे निभावली. मी माझ्या प्रत्येक भूमिकेला न्याय देतो आणि त्यासाठी मी प्रचंड मेहनत देखील घेतो त्यामुळे मी माझी फी कमी करू शकत नाही", असं देखील त्यांनी सांगितलं. राजकुमार यांची अशी मजेशीर शैली चाहत्यांना खूप आवडायची.

आपल्या फिल्मी करिअरमध्ये राजकुमार यांनी 'रंगा', 'सौदागर', 'मदर इंडिया', 'पाकिजा', 'मरते दम तक' तसेच 'हीर रांझा' या चित्रपटांमधील त्यांनी केलेल्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. 

टॅग्स :राज कुमारबॉलिवूडसेलिब्रिटी