Join us  

'धुम- ४' मध्ये रणबीर कपूरची वर्णी ? जॉन, हृतिक, आमिर खान नंतर अभिनेत्याच्या नावाची चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 3:12 PM

आदित्य चोपडा यांच्या आगामी धूम-४' मध्ये अभिनेता रणबीर कपूर दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आज त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करतो आहे. आपल्या वाढदिवसाच्यानिमित्ताने अभिनेत्याने चाहत्यांना एक गोड सरप्राईज दिलं आहे. आदित्य चोप्रा यांच्या 'धूम-४' च्या नव्या फ्रेंचायझीमध्ये रणबीर दिसणार असल्याचं कळतंय. जॉन अब्राहम, अभिषेक, हृतिक रोशन तसेच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्यानंतर अभिनेत्याची वर्णी लागल्याचे तर्क लावण्यात येत आहेत. या चित्रपटात रणबीर खलनायकच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अनिमलच्या यशानंतर आता अभिनेत्याच्या हाती हा नवा प्रोजेक्ट लागला आहे. या चित्रपटात शाहरुख खान खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. त्यांच्यानंतर रणबीर कपूरचेही नाव पुढे आले आहे. 

'धूम-४' मध्ये रणबीर कपूर झळकणार?

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचे समीक्षक सुमित कडेल यांनी सोशल मीडियाद्वारे 'धूम-४' मध्ये रणबीर कपूरला कास्ट करण्यात आल्याचं सांगितल आहे. असं असलं तरी अद्याप चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. शिवाय 'यश राज फिल्म'कडून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर रणबीर कपूर धूम-४ मध्ये दिसणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे.

'धूम' चित्रपटाचा पहिला भाग २७ ऑगस्ट २००४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. तसेच या चित्रपटाचा दुसरा भाग २००६ मध्ये तर तिसरा भाग २०१३ रिलीज करण्यात आला. आता प्रेक्षक चित्रपटाच्या चौथ्या पार्टची आतुरतेने वाट बघत आहेत. सध्या अभिनेता रणबीर कपूर 'लव अॅंड वॉर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर २०२५ च्या अखेरीस किंवा २०२६ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सरुवात करण्यात येणार आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया