बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाच्या फॅन्ससाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार रणदीप हुड्डा याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. बुधवारीच्या सकाळी रणदीप हुड्डाला मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये बाहेर स्पॉट केलं आहे. अशी बातमी आहे की, लवकरच रणदीप हुड्डाची सर्जरी होणार आहे. ही सर्जरी कशाची आणि का होत आहे याबाबत अजून खुलाासा झालेला नाही.
Bollywoodlife.com मध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, अभिनेता रणदीप हुड्डाच्या एका खास मित्राने मीडियाला सांगितले की, त्याची एक मोठी सर्जरी होणार आहे. रणदीप हुड्डाला बुधवारी सकाळी क्रीम कलरची टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या कार्गो पॅंटमध्ये बघण्यात आलं. अशीही बातमी समोर येत आहे की, हॉस्पिटलमध्ये भरती होण्याआधी रणदीप हुड्डाने त्याची कोरोना व्हायरसची टेस्टही केली आहे.
काही महिन्यांपूर्वीच अभिनेता रणदीप हुड्डा सॅम हॅग्रावचं निर्देशन असलेल्या 'एक्सट्रॅक्शन' या सिनेमात दिसला होता. या सिनेमाच्या माध्यमातून त्याने हॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. या सिनेमात सुपरहिरो थॉर क्रिस हेम्सवर्थची मुख्य भूमिका होती. या सिनेमाची निर्मिती रूसो ब्रदर्स द्वारे करण्यात आली होती. या सिनेमातील रणदीपच्या कामाचं भरभरून कौतुक करण्यात आलं होतं.
काही दिवसांपूर्वीच रणदीप हु्ड्डाने त्याचा वाढदिवस साजरा केला होता. सोशल मीडियातून त्याच्या फॅन्सने त्याला भरभरून शुभेच्छाही दिल्या होत्या. अशात आता त्याला नेमकं काय झालंय, कशाची सर्जरी होणार या चिंतेत त्याचे फॅन्स आहेत.
हे पण वाचा :