Join us

'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची हॉलिवूड चित्रपटात वर्णी; जॉन सीनासोबत करणार स्क्रीन शेअर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:25 IST

रणदीप हुड्डा हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

Randeep Hooda Hollywood Movie: 'हायवे', 'सुल्तान, 'राधे' आणि 'सरबजीत' यांसारख्या सुपरहिट चित्रपटात झळकलेला रणदीप हुड्डा (Randeep Hooda) बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता आहे. अलिकडेच रणदीप हुड्डा त्याच्या 'स्वातंत्र्य वीर सावकर' चित्रपटामुळे चर्चेत आला होता. अभिनेत्याने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. पण, आता बॉलिवूड इंडस्ट्री गाजवल्यानंतर रणदीपची हॉलिवूड चित्रपटात वर्णी लागली आहे.  'मॅचबॉक्स' या त्याच्या आगामी हॉलिवूड अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमात तो काम करताना दिसणार आहे. याआधी रणदीप हुड्डा २०२० मध्ये 'एक्सट्रॅक्शन' या हॉलिवूड चित्रपटात झळकला होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिनेता, 'WWE' सुपरस्टार जॉन सीनासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे रणदीपचे चाहते देखील उत्सुक आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, 'मॅचबॉक्स' हा अ‍ॅक्शनपट असून या चित्रपटात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री टेयोना पेरिस, जेसिका बील आणि सॅम रिचर्डसन यांसारखे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'ॲव्हेंजर्स, एंडगेम' तसेच 'एक्स्ट्रॅक्शन-2' या सुपरहिट सिनेमाचे दिग्दर्शक (sam hargrave) यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. दरम्यान, युरोपमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरु करण्यात आल्याची माहिती देखील मिळते आहे. 

रणदीप हुड्डाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अलीकडेच त्याची 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटामुळे सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर लवकरच तो सनी देओल स्टारर 'जाट' सिनेमात झळकणार आहे. 

टॅग्स :रणदीप हुडाबॉलिवूडसेलिब्रिटीहॉलिवूडसिनेमा