Join us

Ranveer Singh Photoshoot: न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंग अडचणीत; चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 8:40 PM

रणवीर सिंगच्या फोटोशूटमुळे मोठा वादंग निर्माण झाला

Ranveer Singh Nude Photoshoot: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याने न्यूड फोटोशूट केल्यापासून तो चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या या धाडसी निर्णयानंतर त्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे दिसत आहे. त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले, पण काही सेलिब्रिटींनी या न्यूड फोटोशूटला पाठिंबा दिला. त्याच दरम्यान आता रणवीर सिंग आणखी एका अडचणीत सापडला आहे. मुंबईतील चेंबूर (Mumbai - Chembur) पोलीस ठाण्यात रणवीर सिंग विरोधात तक्रार दाखल (Police Complaint register) करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीचा दाखला देत एका संस्थेकडून हे न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी ही तक्रार केली आहे.

रणवीरच्या फोटोशूटचे फोटो व्हायरल झाल्यानंतर श्याम मंगाराम फाऊंडेशन नावाच्या NGO ने अभिनेत्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीत लिहिले आहे- 'आम्ही ६ वर्षांपासून लहान मुले आणि विधवा स्त्रियांच्या चांगल्या भविष्यासाठी एकजुटीने काम करत आहोत. आम्ही गेल्या आठवड्यात रणवीर सिंगचे न्यूड व्हायरल झालेले फोटो पाहिले. ही छायाचित्रे ज्या प्रकारे काढली आहेत, ते पाहून कोणत्याही स्त्री आणि पुरुषाला लाज वाटेल.'

रणवीर सिंगने नुकतेच एका पेपर मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. अभिनेत्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच ते वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. अभिनेत्याच्या या फोटोशूटची सर्वत्र चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर अनेकांनी अभिनेत्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मीम्स व्हायरल झाले आणि त्यानंतर अनेक सेलिब्रिटी रणवीर सिंगच्या समर्थनार्थ समोर आले. त्याच वेळी या फोटोशूटबाबत प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.

रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोंवर आलिया भट्टचे वक्तव्यही चर्चेत आहे. अलीकडेच पत्रकार परिषदेत आलिया भट्टला रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा अभिनेत्रीने उत्तर दिले. आलिया म्हणाली- 'माझ्या आवडत्या रणवीर सिंगबद्दल मला काहीही नकारात्मक ऐकू येत नाही. त्यामुळे हा प्रश्न मलाही सहन होत नाही. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो. तो फक्त माझाच नाही तर सगळ्यांचा लाडका आहे. त्याने उत्तम चित्रपट केले आहेत, त्यामुळे आपण त्याला फक्त प्रेम दिले पाहिजे.'

टॅग्स :रणवीर सिंगमुंबई पोलीसबॉलिवूडव्हायरल फोटोज्