Join us

सलमानचा 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर सुसाट; दोन दिवसांत जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 09:16 IST

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतीक्षित 'सिकंदर' सिनेमा ३० मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

Sikandar Day-2 Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतीक्षित 'सिकंदर' सिनेमा ३० मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ईदच्या निमित्ताने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ए.आर.मुरुगदास दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली होती. या वर्षातला ओपनिंग डेचा सर्वाधिक कमाई करणारा 'सिकंदर' दुसरा चित्रपट आहे. आता 'सिकंदर' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमावले? हे समोर आलं आहे.

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाने पहिल्याच दिवशी २६ कोटींचा व्यवसाय केला होता. त्यानंतर सोमवारी म्हणजेच ३१ मार्चला चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. दुसऱ्या दिवशी सिकंदर चित्रपटाने जवळपास २९ कोटींचा गल्ला जमवला. आतापर्यंत चित्रपटाने एकूण ५५ कोटी कोटींची कमाई केली आहे. सोमवारी ईदच्या दिवशी 'सिकंदर'ने बॉक्स ऑफिसवर चांगलं क्लेक्शन केलं आहे. पण, या आकड्यांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

सध्या सगळीकडे फक्त सलमानच्या 'सिकंदर'ची चर्चा पाहायला मिळत आहे. 'सिकंदर' पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहे. त्यामुळे  चाहत्यांमध्ये सलमानच्या 'सिकंदर'ची क्रेझ पाहायला मिळत आहे.'सिकंदर'मध्ये सलमानसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर २०० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाची सत्यराज, काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतीक बब्बर, अंजिनी धवन अशी स्टारकास्ट आहे.

टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदानाबॉलिवूडसिनेमाबॉक्स ऑफिस कलेक्शन