Join us

पहिला पगार फक्त ७५ रुपये, आज घेतो सर्वाधिक मानधन! वाचा सुपरस्टारचा प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 8:11 PM

बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर संघर्ष कुणाला चुकलेला नाही.

Salman Khan Journey: बॉलिवूडमध्ये स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर संघर्ष कोणाला चुकलेला नाही. आजवर अनेक कलाकारांनी इंडस्ट्रीत आपला जम बसवण्यासाठी प्रचंड मेहनत केली. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेता सलमान खान.बॉलिवूडच्या या सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. पण, असं असलं तरी सलमानचा इथपर्यंतचा प्रवास फार काही सोपा नव्हता. 

सलमान खान स्क्रीनप्ले रायटर सलीम खान यांचा मुलगा असूनही इंडस्ट्रीत स्वत: चं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत करावी लागली. एका मुलाखातीत अभित्याने त्याच्या संघर्ष काळावर भाष्य केलं. त्यादरम्यान सलमान म्हणाला, "मला आठवतंय माझा पहिला पगार अंदाजे ७५ रुपये इतका होता. त्यावेळी मी ताज हॉटेलमध्ये एका शोसाठी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं. माझा एक मित्र तिथे डान्स करण्यासाठी जायचा. एक मज्जा म्हणून मी तेव्हा त्याच्यासोबत ताजमध्ये गेलो होतो. त्यानंतर एका जाहिरातीसाठी मला ७५० रुपये मानधन मिळालं. मग मी 'मैने प्यार किया' मध्ये काम केलं. त्याकरिता मला ३१ हजार रुपये देण्यात आले होते. ज्यामध्ये नंतर वाढ करून एकुण ७५ हजार रुपयाचं मानधन मला देण्यात आलं".

सलमान खानने १९९८ मध्ये आलेल्या 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून इंडस्ट्रीत डेब्यू केला. या सिनेमा तो सहकलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळाला. परंतु 'मैने प्यार किया' चित्रपटाने अभिनेत्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. त्यानंतर सलमानने कधीच मागे वळून पाहिले नाही. सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत त्याचं नाव अव्वल स्थानावर येतं. 

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान एका चित्रपटासाठी १०० कोटींपेक्षा जास्त मानधन आकारतो. शिवाय हा सुपरस्टार २९९० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. सध्या अभिनेता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'बिग बॉस-१८'मुळे चर्चेत आला आहे. त्याचबरोबर लवकरच सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटीप्रेरणादायक गोष्टी