Join us

'माझं खूप प्रेम...', सलमान खानचं ३४ वर्ष जुनं पत्र व्हायरल, भाईजानने कोणासाठी लिहिलं होतं लव्हलेटर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 15:01 IST

सलमानने हे खास पत्र कुणासाठी लिहलं होतं, हे जाणून घेऊया.  

 बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी एक म्हणून सलमान खानला ओळखले जाते. कुठल्या ना कुठल्या कारणावरून सलमान सतत चर्चेत असतो. सध्या सलमान खानने लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर सलमानने हे खास पत्र कुणासाठी लिहलं होतं, हे जाणून घेऊया.  

सुपरस्टार सलमान खानच्या हस्ताक्षरातील पत्र समोर आलं आहे. हे पत्र सलमानने 1990 मध्ये चाहत्यांसाठी लिहलं होतं. 'मैने प्यार किया' चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर सलमानने पत्र लिहलं होतं. या पत्रातून सलमानने चाहत्यांना आश्वासन दिलं होतं की तो नेहमी चांगले चित्रपट करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहिल.

सलमान खानने पत्रात लिहिलं होतं, 'माझ्या प्रिय चाहत्यांनो, माझ्याविषयी अशा काही गोष्टी आहे, ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. कारण तुम्ही माझा स्वीकार केला आणि माझे चाहते बनलात. मला आशा आहे, माझ्या प्रत्येक चित्रपटातून मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करेन. मी सर्वोत्तम स्क्रिप्ट निवडण्यावर देतोय'.

दबंग खानने पुढे लिहिलं की, 'मी फक्त सर्वोत्तम स्क्रिप्टवर लक्ष केंद्रित करत आहे. कारण मला माहित आहे की, मी आता जे काही करेन, त्याची तुलना 'मैने प्यार किया' सिनेमाशी होईल. त्यामुळे यापुढे माझ्या चित्रपटाची घोषणा झाल्यास, तो चांगलाच असेल यावर विश्वास ठेवा. मी माझे 100 टक्के सर्वोत्तम देईन. माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्हीसुद्धा माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहाल अशी अपेक्षा आहे. कारण ज्यादिवशी तुमच्याकडून प्रेम मिळणं बंद होईल, त्यादिवशी माझे चित्रपट बंद होतील आणि तोच माझ्या करिअरचा शेवट असेल. लक्षात ठेवा, तुमच्यासारख्या लोकांमुळेच आम्ही बनतो’

अभिनेत्याने पुढे लिहिले, 'माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला फार काही सांगायचं नाही, कारण तुम्हा सर्वांना ते आधीच माहित आहे. लोकांना वाटते की मी चित्रपटात आश्चर्यकारक काम केले आहे, परंतु मला असे वाटत नाही की मला अजूनही माझी जागा बनवायची आहे आणि मला फक्त एक गोष्ट माहित आहे की तुम्ही लोकांनी मला स्वीकारले आहे. धन्यवाद'. दरम्यान सलमानचा 'मैने प्यार किया' हा चित्रपट २९ डिसेंबर १९८९ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात भाग्यश्री मुख्य भूमिकेत होती. चित्रपटातील डॉयलॉग आणि गाणी आजही लोकप्रिय आहेत. 

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीबॉलिवूड