Join us  

निगेटिव्ह शक्तींवर आहे सलमानचा विश्वास? 'या' खास कारणासाठी वापरतो निळ्या खड्याचं ब्रेसलेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 1:27 PM

Salman khan: गेल्या कित्येक वर्षांपासून सलमानच्या हातात निळ्या खड्याचं एक ब्रेसलेट आहे. हे ब्रेसलेट तो कधीच त्याच्यापासून वेगळं करत नाही.

भाईजान, सल्लूमियाँ, दबंग खान अशा कितीतरी नावांनी लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे सलमान खान. गेल्या कित्येक वर्षांपासून सलमान कलाविश्वावर राज्य करत आहे. विशेष म्हणजे त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. वयाची पन्नाशी पार केलेल्या या अभिनेत्याचे आज असंख्य चाहते असून प्रत्येक जण त्याला फॉलो करत असतो. यात बऱ्याचदा त्याची स्टाइल कॉपी करायचा अनेक जण प्रयत्न करतात. सलमानच्या हातात असलेलं निळ्या खड्याचं ब्रेसलेट तर बऱ्याच तरुणांच्या हातात पाहायला मिळतं. ही तरुण मंडळी स्टाइल म्हणून हे ब्रेसलेट परिधान करत असले. तरीदेखील सलमान मात्र, एका खास कारणासाठी ते वापरतो. 

गेल्या कित्येक वर्षांपासून सलमानच्या हातात निळ्या खड्याचं एक ब्रेसलेट आहे. हे ब्रेसलेट तो कधीच त्याच्यापासून वेगळं करत नाही. त्यामुळे त्याच्या बऱ्याच चित्रपटांमध्येही ते त्याच्या हातात पाहायला मिळतं. मात्र, हे ब्रेसलेट घालण्यामागे एक खास कारण आहे. हे कारण, नुकतंच समोर आलं आहे.

'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या नकारामुळे सलमानला मिळाला 'मैने प्यार किया'; बऱ्याच वर्षाने अभिनेत्याने केला खुलासा

सलमान का वापरतो हे ब्रेसलेट?

सलमान वापरत असलेलं ब्रेसलेट त्याने स्वत: खरेदी केलं नसून त्याला ते गिफ्ट मिळालं आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने याविषयी भाष्य केलं होतं. या ब्रेसलेटमध्ये असलेला निळा खडा माझं रक्षण करतो, असं तो म्हणाला होता.

"मला हे ब्रेसलेट भेटवस्तू म्हणून मिळालं होतं. यातला खडा माझं नकारात्मक गोष्टींपासून संरक्षण करतो. माझ्यावर कोणतंही संकट आलं तर, हा स्टोन माझं त्यापासून माझा बचाव करतो. जर माझ्यावर कोणतं संकट येणार असेल तर हा खडा आपोआप तुटतो", असं सलमान म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "हा खडा मला माझ्या वडिलांनी भेट म्हणून दिला होता. या खड्याचं नाव फिरोजा असं आहे. जगात फक्त दोनच जिवंत खडे आहेत. यातला एक अकीक आणि दुसरा फिरोजा."

फिल्मफेअरमध्ये झाली सलमानची फसवणूक; भाईजानने केला खुलासा

दरम्यान, सलमानप्रमाणेच त्याचे वडीलदेखील निळ्या रंगाचा खडा परिधान करतात. या खड्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा खडा परिधान केल्यानंतर कोणत्याही अडचणी येत नाहीत. सलमानच्या हातात असलेला हा त्याचा सातवा खडा आहे. यापूर्वी त्याच्या हातातील सहा खडे तुटले आहेत. सलमान लवकरच किसी का भाई किसी की जान या सिनेमात झळकणार आहेत. एप्रिल महिन्यात ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार असून त्यात अभिनेत्री पूजा हेडगे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा