Join us

"२ कोटी द्या अन्यथा..."; सलमान खानला पुन्हा धमकी! अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 10:39 AM

सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी. वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (salman khan)

सलमान खानला सध्या विविध स्तरांमधून बिष्णोई गँगकडून धमक्यांचे फोन आणि मॅसेज येत आहेत. याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून काही अज्ञात व्यक्तींकडून सलमान खानला धमक्यांचे आणि खंडणीचे फोन, मॅसेज येत आहेत. अशातच सलमान खानच्या फॅन्ससाठी आणखी एक चिंतानजक बातमी समोर आलीय. सलमान खानला एका अज्ञात व्यक्तींकडून पुन्हा एकदा धमकीचा फोन आला असून त्या अज्ञात व्यक्तीने सलमानकडून २ कोटींची मागणी केलीय. 

सलमानला पुन्हा धमकी

इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार,  एका अज्ञात व्यक्तीने ट्रॅफिक पोलिसांना मॅसेज केलाय. यामध्ये मागणी करण्यात आलीय की, जर सलमानने २ कोटी रुपयांची पूर्तता केली नाही तर त्याला जीवे मारण्यात येईल, अशी धमकी देण्याता आलीय. त्यामुळे वरळी पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल करण्यात आलंय. त्यामुळे  354(2) आणि 308(4) अंतर्गत या धमकीप्रकरणी अज्ञात व्यक्तीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

सलमान खानला यापूर्वीही आलेली धमकी

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला कालच एक धमकी देण्यात आली होती. मोहम्मद तैयब नावाच्या व्यक्तीने मुंबई कंट्रोल रूम नंबरवर टेक्स्ट मेसेज पाठवला आणि म्हटलं की, "आम्ही सलमान खानला सोडणार नाही. खूप वाईट होईल. लास्ट वॉर्निंग देत आहोत." याप्रकरणी आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सलमान खानसोबत सध्या धमक्यांचे एकामागून एक सत्र सुरु आहे. 

 

 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडबिग बॉस