'सुल्तान'मध्ये अनुष्का शर्मा नाही तर झळकली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री; सलमाननेच केलं होतं रिजेक्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 11:16 AM2024-12-11T11:16:05+5:302024-12-11T11:18:11+5:30

मनोरंजन जगतात सलमान खानचा 'सुल्तान' हा चित्रपट चर्चेचा विषय बनला.

bollywood actor salman khan reveals in bigg boss season 15 show about in sultan movie mrunal thakur was the first choice for female lead not anushka sharma | 'सुल्तान'मध्ये अनुष्का शर्मा नाही तर झळकली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री; सलमाननेच केलं होतं रिजेक्ट 

'सुल्तान'मध्ये अनुष्का शर्मा नाही तर झळकली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री; सलमाननेच केलं होतं रिजेक्ट 

Mrunal Thakur: मनोरंजन जगतात सलमान खानचा 'सुल्तान' हा चित्रपट चर्चेचा विषय बनला. त्यावेळी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'सुल्तान' हा चित्रपट चांगलाच हिट झाला होता. या चित्रपटात सलमानसोबत बॉलिवूड  अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. आदित्य चोप्राची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांचे आहे. २०१६ प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ६०० कोटींचा गल्ला जमावला.दरम्यान, या चित्रपटामध्ये सलमान आणि अनुष्काने रेसलरची भूमिका साकारली होती. शिवाय चित्रपटातील दोघांमध्ये असलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. अनुष्काने सुल्तानमध्ये आरफा या कुस्तीपटूचं पात्र साकारलं होतं. पण, 'सुल्तान'साठी अनुष्का शर्मा दिग्दर्शकांची पहिली पसंत नव्हती. तर मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) अरफाचं पात्र साकारणार होती. याचा खुलासा सलमान खानने केला होता.

सलमान खानने 'बिग बॉस-१५' च्या शोमध्ये सुल्तान चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल सांगितलं होतं. त्यादरम्यान मृणाल ठाकूर तिच्या 'जर्सी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये हजेरी लावली होती. त्या एपिसोडमध्ये सलमानने मृणालचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यावेळी अभिनेता सलमान खान म्हणाला की, "मी तुम्हाला मृणालच्या बाबतीत एक मजेदार किस्सा सांगणार आहे. खरंतर 'सुल्तान'साठी लीड अ‍ॅक्ट्रेस हीच होती. त्याचबरोबर मृणाल मला त्यावेळी फार्म हाऊसवर भेटण्यासाठी आली होती. तिला अली अब्बास घेऊन आले होते."

पुढे सलमान म्हणाला, "त्यानंतर चित्रपट निर्मात मृणालला रेसलरच्या भूमिकेसाठी माझ्याकडे घेऊन आले होते. पण त्यावेळेस तिची शरीरयष्टी रेसलरप्रमाणे नव्हती. भले ती 'सुल्तान'चा भाग होऊ शकली नाही पण मला महिती होतं की ती पुढे यापेक्षाही चांगल्या चित्रपटांमध्ये काम करेल."त्यावर प्रतिक्रिया देताना मृणाल म्हणाली की, "हो, मी त्या रोलसाठी माझं वजन सुद्धा कमी केलं होतं."

मृणार ठाकूरच्या वर्कफ्रंटबद्दल  सांगायचं झालं तर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'सुपर 30', 'जर्सी', 'तूफान', 'बाटला हाउस' यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. 

Web Title: bollywood actor salman khan reveals in bigg boss season 15 show about in sultan movie mrunal thakur was the first choice for female lead not anushka sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.