Join us

'शांत बस..ती दोन मुलांची आई आहे'; नयनताराविषयी चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं भारी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 9:28 AM

Shahrukh khan: पुष्कर नावाच्या एका चाहत्याने शाहरुखला दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्याविषयी प्रश्न विचारला.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याचा 'जवान' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. शाहरुख सुद्धा या सिनेमाचं प्रमोशन करण्यात बिझी आहे. यात अलिकडेच त्याने ट्विट्वर 'आस्क एसआरके' हे सेशन घेतलं. यावेळी त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. विशेष म्हणजे यात एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं त्याने भन्नाट उत्तरं दिलं. हे उत्तर सध्या चर्चिलं जात आहे.

शाहरुख कायमच ट्विटरवर आस्क एसआरके हे सेशन घेत असतो. त्यामुळे त्याच्याविषयी चाहत्यांना पडलेले प्रश्न ते दिलखुलासपणे त्याला विचारतात. विशेष म्हणजे शाहरुख सुद्धा या चाहत्यांच्या प्रश्नाचं आपुलकीने उत्तर देत असतो. यात अलिकडेच पुष्कर नावाच्या एका चाहत्याने त्याला दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्याविषयी प्रश्न विचारला.

'तुम्ही नयनतारा मॅमवर फिदा झालात की नाही?' असा प्रश्न या चाहत्याने शाहरुखला विचारला. त्यावर 'चूप बस्स. ती दोन मुलांची आई आहे. हा..हा..', असं मजेशीर उत्तर शाहरुखने दिलं. किंग खानने दिलेल्या या उत्तरानंतर अनेकांनी त्याला भन्नाट प्रश्न विचारायला सुरुवात केली. यात मुलींना इंप्रेस कसं करायचं?  असाही प्रश्न एका चाहत्याने विचारलं.

दरम्यान, शाहरुखचा बहुचर्चित ‘जवान’ हा सिनेमा ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर नयनतारा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, सान्या मल्होत्रा आणि दीपिका पदुकोणसह बऱ्याच महिला कलाकार आहेत. तसेच विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :शाहरुख खानसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा