Join us

बॉलिवूड अभिनेत्याचा आईबरोबरचा लहानपणीचा फोटो होतोय व्हायरल, तुम्ही ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 18:24 IST

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, या चिमुकल्याचा फोटो पाहून तो नक्की कोणता अभिनेता असेल? याचा अंदाज बांधणं कठीण आहे. 

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल चाहत्यांना जाणून घेण्यात नेहमीच उत्सुकता असते. त्यामुळेच आवडते सेलिब्रिटी लहानपणी कसे दिसायचे याबाबत त्यांना रस असतो. अशाच एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, या चिमुकल्याचा फोटो पाहून तो नक्की कोणता अभिनेता असेल? याचा अंदाज बांधणं कठीण आहे. 

या फोटोत चिमुकल्याबरोबर त्याची आईदेखील दिसत आहे. फोटोतील चिमुकल्याच्या क्युटनेसने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फोटोत दिसणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा कबीर सिंग म्हणजेच शाहीद कपूर आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त शाहीदने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. "हॅपी बर्थडे आई. तुझ्यासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही," असं शाहीदने पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

शाहीद कपूरच्या आईचं नाव नीलिमा अझीम असं आहे. नीलिमादेखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. दमदार अभिनयाने त्यांनी ९०चा काळ गाजवला. नीलिमा अझीम यांनी अभिनेता पंकज कपूर यांच्याशी १९७९ साली लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर ६ वर्षांतच ते एकमेकांपासून वेगळे झाले. शाहीद हा नीलम आणि पंकज यांचा मुलगा आहे. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शाहीदने अभिनयाची वाट धरली. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. 

टॅग्स :शाहिद कपूरसेलिब्रिटी