Shah Rukh Khan :बॉलिवूड अभिनेता, सुपरस्टार शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) जगभरात चाहते आहेत. किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने तो ओळखला जातो. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहेय. आज किंग खान त्याचा ५९ वाढदिवस साजरा करतो आहे. परंतु संपूर्ण जग अभिनेत्याला ज्या नावाने ओळखतं ते त्याचं खरं नाव नाव नसून त्याचं बालपणीचं नाव काही वेगळं होतं. आज अभिनेत्याच्या वाढदिवशी याबद्दल जाणून घेऊया.
बॉलिवूडचा (bollywood) बादशाह म्हणून ओळख मिळवलेला अभिनेता शाहरुख खानचं बालपणीचं नाव काही वेगळंच होतं. त्याच्या आजीने नामकरण केलं होतं. परंतु ते नाव कुठेही रजिस्टर झालं नाही आणि कालांतराने नाव बदलण्यात आलं. याचा खुलासा शाहरुख खानने 'अनुपम खेर शो' च्या एका एपिसोडमध्ये केला होता. या लाईव्ह शो दरम्यान अनुपम खेर अभिनेत्याला प्रश्न विचारतात की, शाहरुख 'अब्दुल रहमान' नावाच्या कोणत्या व्यक्तीला ओळखतो का? यावर उत्तर देताना शाहरुख म्हणतो, "मी या नावाच्या कोणत्या व्यक्तीला तर ओळखत नाही. पण माझी आजी होती, आम्ही सगळे तिला पिश्नी म्हणायचो, तिने लहान असताना माझं नाव अब्दुल रहमान ठेवलं होतं. तिला वाटत होतं की माझं नाव 'अब्दुल' असावं".
पुढे अनुपम खेर यांनी अभिनेत्याला आणखी एक प्रश्न विचारला की ,"मग त्याचं नाव कोणी बदललं? त्यावर शाहरुख म्हणाला माझ्या वडिलांनी माझं नाव बदललं. त्यावेळी त्यांनी माझ्या बहिणीचं नाव लाला रुख ठेवलं,जे एका खूप मोठ्या कवितेवर आधारित आहे. त्यांच्याकडे एक घोडा होता, त्याचं नाव देखील लाला रुख होतं. तेव्हा त्यांना वाटत होतं की त्याचं नाव लाला रूख असावं आणि माझं शाहरुख असावं. ज्याचा अर्थ राजकुमार सारखा असा होतो".