बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवरुन आरोप प्रत्यारोप सुरुच असतात. यावर अनेक अभिनेते मोकळेपणाने बोलतात.'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने (Siddhant Chaturvedi) देखील एका शोमध्ये स्टारकिड अनन्या पांडेसमोरच (Ananya Pandey) नेपोटिझमवरुन टीका केली होती. यावर अनन्याचा चेहरा पडला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर आता सिद्धार्थ एका स्टारकिडच्याच प्रेमात पडला असून दोघं सोबत फिरतानाचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.
तर सिद्धार्थ चतुर्वेदी सध्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदाला (Navya Naveli Nanda) डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. नव्या इतर स्टारकिड्सपेक्षा खूप वेगळी ठरते. ती अभिनयापासून दूर आहे. महिला सबलीकरण, शिक्षण या सामाजिक कार्यासाठी ती काम करते. यासाठी तिने स्वत:चं स्टार्टअपही सुरु केलंय. तर नव्या आणि सिद्धार्थ काही दिवसांपूर्वी विमानतळावर दिसले होते. दोघंही गोव्यात सुट्टी एंजॉय करुन आले होते. तर आता दोघांना पुन्हा सोबत पाहिलं गेलंय. दोघंही मूव्ही डेटवर गेलेले दिसले. ते फोटो आता व्हायरल झाले आहेत.
सिद्धार्थ आणि नव्याला करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीतही पाहिले गेले होते. दोघांनी एकमेकांसोबत डान्सही केला. नुकत्याच झालेल्या फॅशन इव्हेंटमध्ये नव्या नवेली आई श्वेता बच्चन नंदा सोबत पोहोचली होती. या शोमध्ये सिद्धार्थ रॅम्पवॉक करत होता. सिद्धार्थ लवकरच 'खो गए हम कहा' सिनेमात अनन्या पांडेच्या अपोझिट दिसणार आहे. तर मालविका मोहनसोबत फिल्म 'युद्र' मध्येही झळकणार आहे.