Join us  

सोनू सूद बनला देवदूत! परदेशात हैदराबादच्या कुटुंबाची अशी केली मदत; अभिनेत्याचं होतंय कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 3:47 PM

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्याच्या दिलदारपणासाठी ओळखला जातो.

Sonu Sood: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्याच्या दिलदारपणासाठी ओळखला जातो. सोनू सूद कायमच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. गरवंतांच्या मदतीसाठी अभिनेता नेहमीच धावून जातो. चाहत्यांना अभिनेत्याचा हा स्वभाव प्रचंड आवडतो. अशातच सोनू सूद सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या एका भारतीय नागरिकाचं पार्थिव मायदेशात परत आणण्यासाठी त्याने प्रचंड धावाधाव केल्याची माहिती मिळते आहे.

सौदी अरेबियामध्ये एका सिमेंटच्या कंपनीत काम करणाऱ्या भारतीय नागरिकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. परंतु त्या व्यक्तीचं पार्थिव भारतात परत आणण्याकरिता परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे त्या मृत व्यक्तीच्या नजीकच्या एका माणसाने सोशल मीडियाच्या आधारे अभिनेत्यासोबत संपर्क साधला. त्यावर सोनू सूदने लगेचच आपली प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर त्याचं हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये अभिनेत्याने लिहलंय,  "त्यांचा मृतदेह परत आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. संबंधित यंत्रणांसोबत याबाबत बोलणं चालू आहे". आपण दिलेलं वचन पूर्ण करताच अभिनेत्याने हे ट्विट केलं. २० ऑगस्टच्या दिवशी त्या व्यक्तीचा मृतदेह भारतात आणला गेला. इतकंच नाही या सर्व प्रक्रियेमध्ये मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते गिरिश पंत यांचे देखील त्याने आभार मानले आहेत. यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळतंय.

सोनू सूदचं वर्कफ्रंट-

सध्या सोनू सूद त्याचा आगामी महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट 'फतेह' मध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सोनू सूद सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह सिनेमात हॅकरच्या भूमिकेत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय जॅकलीन फर्नांडिसही या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. खास गोष्ट म्हणजे सोनू सूद या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करतोय.

टॅग्स :सोनू सूदबॉलिवूडसेलिब्रिटीसौदी अरेबिया