Sonu Sood :सोनू सूद (Sonu Sood) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या अभिनेता त्याचा आगामी चित्रपट 'फतेह'मुळे चर्चेत आहे. 'फतेह'च्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनाच्या दुनियेत पाऊल ठेवलं आहे. हा चित्रपट सायबर क्राईमवर आधारित असून येत्या १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सोनू सूदसोबत विजय राज, नसीरुद्दीन शाह, जॅकलीन फर्नांडीसही प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्याने शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
सोनू सूदने त्याचा आगामी चित्रपट 'फतेह'च्या रिलीजआधी शिर्डी गाठलं आहे. तिथे जाऊन अभिनेता साईबाबांच्या भक्तीत तल्लीन झाल्याचा पाहायला मिळतोय. दरम्यान, अभिनेत्याने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. "ओम साई राम, सबकी 'फतेह' हो...",असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे.
सोनू सूदने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याचं कौतुक केलं आहे. "रिस्पेक्ट टू सोनू सूद" अशा प्रतिक्रिया सोशल मीडिया यूजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.