Join us

Suniel Shetty : वर्कआऊट जीवावर का बेतू लागलंय? सुनील शेट्टीनं सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 5:55 PM

Suniel Shetty on Death In Gyms : जिममध्ये वर्कआऊट करत असताना सेलिब्रिटींना हृदयविकाराचा झटका आल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्यात. यामुळे लोकांच्या मनात जिम आणि वर्कआऊटबद्दल भीती निर्माण झाली आहे....

Suniel Shetty on Death In Gyms :  गेल्या काही दिवसांत जिममध्ये वर्कआऊट करत असताना सेलिब्रिटींना हृदयविकाराचा झटका आल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्यात. काही महिन्यांआधी कॉमेडियन राजू श्रीवास्तव आणि अगदी काही दिवसांपूर्वीच टीव्ही अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी यांना वर्कआऊट करतानाच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातच त्यांचं निधन झालं. गेल्या महिन्यात सलमानचा बॉडी डबल म्हणून ओळखला जाणारा सागर पांडे याचाही असाच मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी साऊथ स्टार पुनीत राजकुमार यालाही वर्कआऊट करतानाच हृदयविकाराचा झटका आला होता. तो सुद्धा असाच गेला.

या व अशा घटना वाढत आहेत आणि यामुळे लोकांच्या मनात जिम आणि वर्कआऊटबद्दल काहीशी भीती निर्माण झाली आहे. आता यावर अभिनेता सुनील शेट्टीनं मोलाचा सल्ला दिला आहे.  

सुनील शेट्टी त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. आजही तो तितकाच फिट आणि हँडसम दिसतो. त्यामुळे जिम आणि जिम डेथ या विषयावर तो अधिकारवाणीने बोलू शकतो.

काय म्हणाला सुनील शेट्टी?अलीकडच्या काळात अनेक घटनांमुळे लोकांच्या मनात जिम वर्कआऊटबद्दल भीती निर्माण झाली आहे. पण खरी समस्या सप्लिमेंट आहे. होय, जे लोक सप्लिमेंट घेतात, स्टेरॉइड्स घेतात, तीच खरी समस्या आहे. वर्कआऊट हा मुळात प्रॉब्लम नाहीच. हे हार्ट फेल्युअर आहे, हार्ट अटॅक नाही. सप्लिमेंट व स्टेरॉईड्समुळे हे घडतंय, असं सुनील शेट्टी म्हणाला.

सुनील शेट्टीच्या सोशल मीडियावर एकदा नजर टाकली की, तुम्हाला त्याचे फिटनेस प्रेम लक्षात येईल. खरं तर सुनील शेट्टी, संजय दत्त, सनी देओल या अभिनेत्यांनीच बॉलिवूडमध्ये बॉडी बनवण्याचा ट्रेंड आणला. आज तोच ट्रेंड बॉलिवूडचा प्रत्येक नवा अभिनेता फॉलो करताना दिसत आहेत.  फिट राहण्याच्या नावावर लोकांना लुबाडलं जात आहे, वजन कमी करण्यासाठी लोकांच्या मनावर चुकीच्या गोष्टी बिंबवल्या जात आहेत, असं सुनील शेट्टीचं स्पष्ट मत आहे. फिट राहण्यासाठी एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. घरी राहून केवळ संतुलित आहाराच्या जोरावर तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता, असं तो नेहमीच सांगतो.

त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याची ‘धारावी बँक’ ही वेबसीरिज उद्या 19 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. एमएक्स प्लेअरवर ही सीरिज तुम्ही पाहू शकाल.

टॅग्स :सुनील शेट्टीबॉलिवूडफिटनेस टिप्स