Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता तुषार कपूर सायबर भामट्यांच्या रडारवर; फेसबुक अकाउंट झालं हॅक, पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 14:19 IST

बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरने त्याचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या आधारे चाहत्यांना दिली आहे.

Tusshar Kapoor: 'गोलमाल' फ्रँचायझीपासून 'गुड बॉय बॅड बॉय', 'ढोल', 'क्या कूल हैं हम'पर्यंतच्या चित्रपटांमध्ये दिसलेला अभिनेता तुषार कपूर सध्या चर्चेत आला आहे. बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरने नुकताच ओटीटीवर डेब्यू केला आहे. 'दस जून की रात' या वेबसिरीजच्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या समोर येत आहे. अलिकडेच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टच्या आधारे अभिनेत्याने त्याचं सार्वजनिक आणि खासगी फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहलंय, हॅलो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की माझे दोन्ही सार्वजनिक आणि खासगी फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले आहेत. ज्यामुळे मी बरेच दिवस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव्ह नाही. माझी टीम आणि मी यावर मार्ग काढत आहोत शिवाय अकाउंट पुन्हा सुरू कसं करता येईल याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच ते पुन्हा सक्रिय होईल. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद!

दरम्यान, तुषार कपूरने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्याची पोस्ट पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडियासोशल व्हायरल