Join us

'स्काय फोर्स'साठी वीर पहारियाने घेतल्या जान्हवी कपूरकडून टिप्स? अभिनेता खुलासा करत म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:40 IST

अभिनेता वीर पहारिया 'स्काय फोर्स' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे.

Veer Pahariya: बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत असलेला 'स्काय फोर्स' हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात रिलीज करण्यात येणार आहे. अभिनेता वीर पहारिया (Veer Pahariya) आणि सारा अली खान देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून वीर पहारियाने इंडस्ट्रीत डेब्यू केला आहे. यासाठी वीरने अभिनेत्री जान्हवी कपूरकडून (Janhavi Kapoor) टीप्स घेतल्याचा खुलासा त्याने केला. वीर पहारिया जान्हवी कपूरच्या रुमर्ड बॉयफ्रेंड शिखर पहारियाचा भाऊ आहे. 

सध्या 'स्काफोर्स' सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने वीर पहारियाला काही प्रश्न विचारण्यात आले. 'एचटी सिटी स्टार्स इन द सिटी'सोबत बातचीत करताना वीरला विचारण्यात आलं की त्याने या चित्रपटासाठी जान्हवी कपूरकडून काही टिप्स घेतल्या होत्या का या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, "मला वाटतं की ती एक टॅलेंटेड अ‍ॅक्ट्रेस आहे. शिवाय तिने 'गुंजन सक्सेना' मध्ये काम केलं आहे." 

पुढे वीर म्हणाला, "तो सिनेमादेखील एक बायोपिक होता. तर माझे जे काही मित्र आहेत त्यांच्याकडून मी कायम सल्ला घेत असतो. शिवाय तिला देखील खूप अनुभव आहे. या चित्रपटासाठी  तिने बऱ्याच मला गोष्टींसाठी मार्गदर्शन केलं." असा खुलासा अभिनेत्याने केला. 

येत्या २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. 'स्काय फोर्स'मध्ये अक्षय कुमारसह वीर पहारिया, सारा अली खान आणि निम्रत कौर यांसारखे तगड्या कलाकारांची फळी दिसते आहे.'स्काय फोर्स' सिनेमा १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक रोमांचकारी कथा बघायला मिळणार यात शंका नाही. या सिनेमात अक्षय कुमार एअर फोर्स अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरअक्षय कुमारबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा