Join us

पाकिस्तानात आजही आहेत या कलाकारांची पिढीजात घरं, बघा फोटो! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 3:41 PM

आजही बॉलिवूडच्या काही कलाकारांची पिढीजात घरं पाकिस्तानात आहेत. चला बघुया या कलाकारांची घरे...

(Image Credit: www.rvcj.com)

भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील नातं  फाळणीनंतर चांगलं नाही राहिलं. पण दोन्ही देशातील काही लोकांची पाळमुळं अजूनही सीमेपलिकडे पाकिस्तानात आहेत. आजही बॉलिवूडच्या काही कलाकारांची पिढीजात घरं पाकिस्तानात आहेत. चला बघुया या कलाकारांची घरे...

१) देवानंद

बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते देवानंद यांचा जन्म पंजाबच्या शंकरगढ( आता पाकिस्तान) मध्ये झाला होता. त्यांच्या जन्मानंतरच त्यांचं कुटूंब लाहोरमध्ये आलं. देवानंद यांचं बालपणही इथेच गेलं आणि त्यांनी लोहरच्या सरकारी कॉलेजमधून इंग्रजीतून पदवी मिळवली. त्यामुळेच ते नेहमी म्हणत असत की, लाहोर त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. लोहरमध्येच त्यांचं पिढीजात घर आहे. या घराला त्यांनी शेवटी १९९९ मध्ये भेट दिली होती. 

२) राजेश खन्ना

असे म्हटले जाते की, राजेश खन्ना यांचा जन्म पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला होता. पण काही लोकांचा दावा आहे की, त्यांचा जन्म पाकिस्तानातील बुरेवालमध्ये झाला होता. रिपोर्ट्सनुसार, त्यांचे वडील हिरानंद खन्ना हे बुरेवालच्या एमसी स्कूलचे हेडमास्टर होते. नंतर ते अमृतसरला शिफ्ट झाले. 

३) संजय दत्त

संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांचा जन्म पाकिस्तानातील झेलमध्ये झाला होता. तर त्याची आई नर्गिस यांते पूर्वज आजही रावळपिंडीमध्ये राहतात. सुनील दत्त १९४० मध्ये भारतात आले होते. त्यांचं पिढीजात घर आजही पाकिस्तानमध्ये आहे. 

४) शाहरुख खान

शाहरुख खान याचही पाकिस्तानसोबत गहीरं नातं आहे. त्याचे वडील ताज मोहम्मद यांचा जन्म पाकिस्तानातील पेशावरमध्ये झाला होता. पाकिस्तानात त्यांचं पिढीजात घर आहे. आजही शाहरुखचे चुलते इथे राहतात. 

५) दिलीप कुमार

अभिनेते दिलीप कुमार ज्यांचं खरं नाव युसुफ खान आहे त्यांचा जन्म पाकिस्तानातील पेशावरमध्ये झाला होता. पेशावरच्या किस्सा खवानी बाजारात दिलीप कुमार यांचं पिढीजात घर आहे. याच घरात त्यांचं बालपण गेलं होतं. २०१३ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिलीप कुमार यांच्या घराची डागडुजी करण्याचा आदेश दिला होता. नंतर हे घर स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं होतं. २०१७ मध्ये या इमारतीचा काही भाग पाडण्यात आला.

 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी