Aishwarya Rai Bachchan: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ९० च्या दशकात विश्वसुंदरी ऐश्वर्याने दमदार अभिनय तसेच सौंदर्याने बॉलिवूड सिनेसृष्टीत दबदबा निर्माण केला होता. अभिनेत्रीने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. परंतु, ऐन लग्नाच्या सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या एका किसींग सीनमुळे मोठा गदारोळ झाला होता.
ऐश्वर्याने तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच 'धुम-२' चित्रपटात एक लिपलॉक सीन दिला होता. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन ( Hrithik Roshan) तिच्यासोबत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्रीला कायदेशीर कारवाईची नोटीस आली होती. याचा खुलासा अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला. 'डेली मेल'ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली, "मी धुम-२ चित्रपटात लिपलॉक किसींग सीन केल्यामुळे प्रचंड ट्रोल झाले होते. तो सीन त्यावेळेस चर्चेचा मुद्दा बनला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण मला त्या सीनमुळे लीगल नोटीस बजावण्यात आली होती".
पुढे अभिनेत्री म्हणाली, "प्रेक्षकांचं असं म्हणणं होतं की, तुम्ही इतरांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहात. तुम्ही ज्या पद्धतीने स्वत: ची ओळख समाजात निर्माण केली आहे. तो अनेकांसाठी आदर्श आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या सीन्समुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. शेवटी आपल्या या मुद्दयावर स्पष्टीकरण देत ऐश्वर्या राय म्हणाली, या सगळ्या गोष्टींमुळे मला धक्काच बसला होता. मी एक अभिनेत्री आहे आणि हा माझ्या कामाचा भाग आहे. फक्त २-३ तासांच्या या चित्रपटासाठी माझ्याकडून स्पष्टीकरण मागितलं गेलं".
अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लग्नाच्या सहा महिन्यांपूर्वी २६ नोव्हेंबर २०२६ मध्ये धुम-२ चित्रपट रिलीज झाला. तर अभिषेक-ऐश्वर्या २० एप्रिल २००७ मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकले. असं सांगितलं जातं की ऐश्वर्याच्या या सीनमुळे तिच्या कुटंबामध्येही नाराजी होती.