Aishwarya Rai : विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) तिच्या अभिनयासह सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. 'देवदास', 'हम दिल दे चुके सनम', 'जज्बा' अशा अनेक चित्रपटांमधून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ऐश्वर्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेडं लावलं. मनोरंजनविश्वात चित्रपटांपेक्षा ऐश्वर्याच्या सौंदर्याच्या चर्चा व्हायच्या. पण, ऐश्वर्याने तिच्या फिल्मी कारकिर्दीत एका चित्रपटाचं शूटिंग मेकअप न करता केलं आहे. नो मेकअप पॉलिसीवर तिने हा सिनेमा केला होता. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ताल' चित्रपटाचं संपूर्ण शूट तिने मेकअप न करता केलं होतं, असं सांगण्यात येतं.
सुभाष घई दिग्दर्शित 'ताल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटात ऐश्वर्याचा साधा, सोज्वळ लूक पाहायला मिळायला. 'ताल'मध्ये अभिनेत्रीचं मनमोहक सौंदर्य पाहून चाहते तिच्या प्रेमातच पडले होते. या चित्रपटात अभिनेत्री मेकअप न करत खूपच सुंदर दिसत होती. याचा खुलासा सुभाष घई यांनी 'इंडियन आयडल'च्या मंचावर केला होता. त्यावेळी त्यांनी 'ताल' चित्रपटाचा उल्लेख करत त्यामध्ये ऐश्वर्याने बरेच सीन्स विनामेकअप शूट केले होते. चित्रपटात ज्या मुलीला दाखवण्यात आलंय ती पहाडी भागात राहणारी आहे. शिवाय मी तिला एक गोष्ट सांगितली होती की "मला तुझी 'मिस वर्ल्ड'ची ओळख पुसून टाकायची आहे, असं मी तिला म्हटलं होतं".
'ताल'मध्ये ऐश्वर्या रायसोबत अनिल कपूर, अक्षय खन्ना हे कालाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. शिवाय ४५ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सुभाष घई यांना बेस्ट डायरेक्टर तर ऐश्वर्याला बेस्ट अॅक्ट्रेस पुरस्काराने गौरविण्यात आलं.