Join us

कसं आहे आलिया- नीतू कपूर यांच्यामधील सासू-सूनेचं नातं? अभिनेत्री म्हणते, "त्या तर खूपच..." 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 10:02 AM

नुकतीच आलिया भटने करीना कपूरचा टॉक शो 'व्हॉट वुमन वॉन्ट' या कार्यक्रमात हजेरी लावली.

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट( Alia Bhatt) सध्या 'जिगरा' या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. अशातच या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री व्यस्त असल्याची पाहायला मिळते आहे. याचदरम्यान आलियाने तिच्या सासूबाई नीतू कपूर (Neetu Kapoor)  यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. 

नुकतीच आलिया भटने करीना कपूरचा (Kareena Kapoor)  टॉक शो 'व्हॉट वुमन वॉन्ट'या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली.या कार्यक्रमादरम्यान तिने सासूबाई नीतू कपूर यांच्यासोबतच्या बॉण्डिंगवर भाष्य केलं आहे. यावेळी करीना कपूरने आलियाला एक प्रश्न विचारला, कपूर फॅमिलीमध्ये तू कोणाला आयडॉल मानतेस? त्यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, "माझ्या सासूबाई या माझ्यासाठी आयडॉल आहेत. मागील काही वर्षांपासून आमच्यामध्ये मैत्रीचं एक अतूट नातं निर्माण झालंय. अलिकडेच त्या माझ्यासोबत पॅरीसमध्ये आल्या होत्या. जिथे माझा एक इव्हेंट होता. तेव्हा त्या मला म्हणाल्या, मला देखील तुझ्यासोबत यायचं आहे. मग इव्हेंटमध्ये त्यादेखील माझ्यासोबत उपस्थित होत्या. मला सांगताना अभिमान वाटतोय की, जेव्हा मी त्या कार्यक्रमात रॅम्प वॉल्क करत होते. तेव्हा त्या माझा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत होत्या. त्यावेळी मला असं वाटलं की मी शाळेत आले आणि माझी आई माझा परफॉर्मन्स पाहण्यासाठी आली आहे". 

पुढे आलिया म्हणाली, "रणबीरसोबत माझं लग्न होण्यापूर्वी माझं नीतू यांच्यासोबत बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यांनी एक गोष्ट मला आवर्जून सांगितली. तेव्हा त्यांनी त्यांच्या सासूबाई कृष्णा आंटी यांच्यासोबतचं कसं नातं निर्माण केलं होतं, याबद्दल त्यांनी खूप काही सांगितलं. पुढे त्या मला म्हणाल्या की, मला तुझ्यासोबतही तसा बॉण्ड तयार करायचा आहे. मी अगदी प्रमाणिकपणे सांगते, की ते नातं अतूट होतं".

"ज्यावेळी माझे सासरे आजारी होते, तेव्हा घरातील प्रत्येकजण टेन्शनमध्ये असायचा. त्यादरम्यान, माझ्या त्यांच्यासोबतचा बॉण्ड आणखी मजबूत झाला. ऋषी कपूर ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा घरात एकामागून एक वाईट बातमी येत होती. पण, माझ्या सासूबाई खंबीर होत्या. त्या परिस्थितीतही त्या डगमगल्या नाहीत. त्या तर खूपच धीट मनाच्या आहेत. हे सगळं वाटतंय तितकं सोपं नाही आहे पण, त्यांनी परिस्थिती सांभाळून घेतली". असं अभिनेत्रीने सांगितलं. 

टॅग्स :आलिया भटनितू सिंगबॉलिवूडसेलिब्रिटी