बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (athiya shetty) ही नुकतीच आई झाल्याने सर्वांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. अशातच आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री नुकतीच आई झाल्याची गुड न्यूज समोर येत आहे. ही अभिनेत्री म्हणजे अॅमी जॅकसन. बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री अॅमी जॅक्सन (amy jackson) दुसऱ्यांदा आई झाली आहे. अभिनेत्रीने बाळाची झलक शेअर करुन त्याच्या नावाचाही खुलासा केलाय. अॅमी जॅक्सनचा नवरा एड वेस्टविकने २४ मार्चला त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही गुड न्यूज शेअर केली. अॅमी आणि वेड या पती-पत्नीने त्यांच्या आयुष्यात मुलाचं स्वागत केलं. याशिवाय एमीचा नवरा एड वेस्टविकने पत्नी अॅमीचा आणि बाळाचा क्यूट फोटो शेअर केला. बाळाला कडेवर घेऊन अॅमीने खास पोझ दिली. विशेष गोष्ट म्हणजे या पती-पत्नीने बाळाच्या नावाचाही खुलासा केला. अॅमीने तिच्या बाळाचं नाव ठेवलंय ऑस्कर. हे विशेष नाव पाहून सर्वांनीच अभिनेत्री आणि तिच्या पतीचं कौतुक केलंय.