Ananya Pandey :अनन्या पांडे (Ananya Panday) बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिस्ट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, अनन्याने हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिकांच्या यादीत आपलं स्थान पक्कं केलंय. अनन्या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची लेक आहे. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. परंतु एकवेळ अशी होती जेव्हा चंकी पांडेच्या हाती काम नव्हतं. त्यावर लेक अनन्याने भाष्य केलं आहे.
नुकतीच अनन्या पांडेने राज शमनीच्या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी अभिनेत्रीने आपल्या वडिल्यांच्या आयुष्यातील वाईट काळावर भाष्य केलं. त्या दरम्यान अनन्या म्हणाली, "जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या वडिलांच्या करिअरमध्ये चढ-उतार सुरू होते. ८० आणि ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्यापैंकी ते एक आहेत. पण, तरीही त्यांनी त्यावेळी वेगवेगळी काम केली. बराच काळ ते घरी बसून होते. त्यांच्या हाती काहीच काम नव्हतं. मी लहान असताना अनेकदा त्यांच्यासोबत चित्रपटांच्या सेटवर जायचे. तेव्हा त्यांची लोकप्रियताही प्रचंड होती. लोक त्यांची एक झलक पाहण्यासाठी घराबाहेर गर्दी करायचे."
पुढे अभिनेत्रीने तिला वडिलांकडून कोणती गोष्ट शिकावी असं वाटतं, याबद्दल सांगताना ती म्हणाली की, "माझे वडील अष्टपैलू अभिनेते आहेत. आपल्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. छोट्या असो किंवा मोठ्या असो त्यांनी त्या भूमिका उत्तमरित्या वठवल्या. शिवाय त्यांनी विविध भाषांमध्ये काम केलं आहे. मला वाटतं, त्यांच्यातील ही चांगली गोष्ट मी आत्मसात केली पाहिजे."