आपल्या मस्तीखोर स्वभावामुळे ओळखली जाणारी अनुष्का शर्मा (anushka sharma) बऱ्याचदा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही चर्चेत येत असते. अनुष्काने अनेकदा कलाविश्वातील काही गोष्टींवर उघडपणे भाष्य केलं आहे. यामध्येच सध्या तिने दिग्दर्शक, निर्माता करण जोहर (karan johar) याच्याविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 'करणने मला चुकीचा पद्धतीने स्पर्श केला होता. ज्यामुळे मी सेक्शुअल हॅरेशमेंटची केस दाखल केली असती', असं अनुष्काने म्हटलं आहे. सध्या तिचं हे वक्तव्य चर्चेत येत आहे.
सध्या सोशल मीडियावर अनुष्काची एक जुनी व्हिडीओ क्लीप व्हायरल होत आहे. यात 'ए दिल है मुश्किल'च्या वेळी करणने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप अनुष्काने केला आहे. विशेष म्हणजे अनुष्का आणि करण जोहर एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे तिच्या या वक्तव्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
व्हायरल होत असलेली व्हिडीओ क्लीप करणच्या 'कॉफी विथ करण' या शोची आहे. या शोमध्ये अनुष्काने करणचीची पोलखोल केली. त्यामुळे करणही काळासाठी स्तब्ध झाला होता. तिच्यासमोर काय बोलावं हे त्याला सुचत नव्हतं.
अनुष्काचा इंटरव्ह्यु सुरु असताना करण तिची मस्करी करत होता. यावेळी ए दिल है मुश्किलच्या वेळी माझं तुझ्यावर (अनुष्कावर) क्युट क्रश होतं असं करणने तिला सांगितलं. त्यावर, "हे ऐकून छान वाटलं. पण, तुझ्या विरोधात मी सेक्शुअल हॅरेसमेंटची केस दाखल केल्याशिवाय राहणार नाही. कारण, त्यावेळी तू कायम मला चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श करायचास. कतरिना होती त्यामुळे ती सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायची", असं अनुष्का म्हणाली.
दरम्यान, अनुष्का जरी हे मस्करीत बोलत असली तरीदेखील तिने अप्रत्यक्षरित्या सिनेमाच्या सेटवर घडलेला किस्सा चाहत्यांना जाहीरपणे सांगितला आहे. तसंच गेल्या काही काळापासून अनुष्का कलाविश्वापासून दूर आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये अनुष्काचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. मुलगी वामिकाचा जन्म झाल्यानंतर अनुष्काने काही काळासाठी सिनेविश्वातून ब्रेक घेतला होता. मात्र, आता लवकरच झुलन गोस्वामीच्या बायोपिकच्या माध्यमातून अनुष्का प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.