विराट कोहली ( Virat Kohli) ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या एका कंपनीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) हिचा फोटो तिच्या परवानगी शिवाय वापरला अन् नवा वाद सुरू झाला. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने स्पोर्ट्स ब्रँड PUMA विरोधात एक स्टोरी पोस्ट केली आहे. प्युमाने परवानगीशिवाय तिचा फोटो वापरल्याचा दावा अनुष्काने केला आहे आणि तिने नाराजी व्यक्त करत कंपनीने तो फोटो लवकर काढून टाकावेत असे म्हटले आहे. अनुष्का ज्या प्यूमा कंपनीवर आरोप करत आहे, तिचा नवरा विराट त्याच कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. विराटनेही अनुष्काची इंस्टास्टोरी शेअर करून प्यूमा इंडियाला हे प्रकरण सोडवण्यास सांगितले आहे. विराट कोहली सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे आणि २२ डिसेंबरपासून दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना सुरू होणार आहे.
विराटने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनुष्का शर्माच्या कथेचा स्क्रीनशॉट टाकला आणि लिहिले की, प्यूमा इंडियाने हे प्रकरण सोडवावे. याआधी अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर प्यूमा इंडियाला टॅग केले आणि लिहिले की, 'तुम्ही माझ्या फोटोंचा वापर परवानगीशिवाय कोणत्याही ब्रँड प्रसिद्धीसाठी करू शकत नाही, कारण मी तुमच्या कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर नाही. कृपया हा फोटो काढून टाका. अनुष्काने या पोस्टसह रागावलेल्या इमोजीही पोस्ट केल्या आहेत.
प्युमा इंडियावर अनुष्काचा फोटो सीझन सेलसाठी परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप आहे. यामुळे अनुष्का संतापली आहे.
प्युमाने विराटसोबत ११० कोटींचा करार केलाविराट कोहली २०१७ पासून प्युमा इंडियाचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. त्यासाठी प्युमा इंडियाने ११० कोटी रुपयांचा ८ वर्षांचा करार केला होता. म्हणजे प्युमा इंडिया दरवर्षी विराटला १३.७५ कोटी देणार आहे. हा करार २०२५ मध्ये संपेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"