Join us

बॉलिवूड अभिनेत्रीचं सीक्रेट वेडिंग, लग्नाचे फोटो समोर; अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाजलेल्या सिनेमात केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 10:07 IST

आणखी एका अभिनेत्रीने लग्नाचा बार उडवून दिला आहे. अभिनेत्रीने गुपचूप लग्न करत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकत त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. बॉलिवूडमधल्या आणखी एका अभिनेत्रीने लग्नाचा बार उडवून दिला आहे. अभिनेत्रीने गुपचूप लग्न करत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री आयेशा कपूर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. आयेशाने बॉयफ्रेंड अदाम ओबेरॉयसोबत लग्नगाठ बांधत सात फेरे घेतले. दिल्ली येथे रविवारी(२३ मार्च) कुटुंबीयांच्या उपस्थितीत आयेशा आणि अदाम ओबेरॉयचा विवाहसोहळा पार पडला. लग्नाचे फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. अभिनेत्रीने लग्नासाठी गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. तर अदामने शेरवानी सूट घातला होता. 

आयेशा कपूर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. अमिताभ बच्चन यांच्या ब्लॅक सिनेमात ती दिसली होती. राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका तिने साकारली होती. याशिवाय तिने सिकंदर, जिस्म, पानी, अंजान यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रेटी वेडिंगसेलिब्रिटी