कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी या ना त्या कारणामुळे चाहत्यांच्या चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ही कलाकार मंडळी सोशल मीडियावर कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. यात त्यांच्या आगामी सिनेमाचे अपडेट्स किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनातील एखादा किस्सा,फोटो, प्रसंग ते शेअर करत असतात. सध्या नेटकऱ्यांमध्ये एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर सध्या बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बालपणीच्या फोटोची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या आईच्या कडेवर बसली आहे. हा फोटो सध्या नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत असून ही अभिनेत्री कोण असावी असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
व्हायरल होत असलेला फोटो अभिनेत्री करिश्मा कपूरचा आहे. करिश्मा सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मध्यंतरी आईच्या वाढदिवसानिमित्त तिने हा फोटो शेअर केला होता.
दरम्यान, करिश्मा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ९० चा काळ गाजवला आहे. करिश्माच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिची पर्सनल लाइफही तितकीच चर्चेत राहिली. उद्योगपती संजय कपूरसोबत तिने लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. घटस्फोट होताच करिश्माने नवऱ्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.