Join us  

हंगामाच्या नव्या हिंदी ओरिजिनल 'रेड रूम' शोमध्ये उलगडणार गुन्हे, रहस्य अन् फसवणुकीची दुनिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 12:04 PM

ओटीटी मंचावर अभिनेत्री डेजी शाह पदार्पण करत असून अमित गौर आणि अनुज सचदेवा या उत्कृष्ट कलाकारांसह शोची सुरुवात होणार आहे.

Daisy Shah : भारतातील आघाडीचा डिजिटल मनोरंजन मंच असलेला 'हंगामा ओटीटी रेड रूम' या आपल्या नव्या रहस्य - रोमांचक शोसह प्रेक्षकांच्या समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री डेजी शाहचे ओटीटी पदार्पण याद्वारे होणार आहे. तसेच अभिनेता अमित गौर, अनुज सचदेवा, अभिनेत्री रीना अग्रवाल आणि रीवा चौधरी यांसारखी तगडी स्टारकास्ट या शोमध्ये दिसणार आहे. 'रेड रूम' शोमध्ये प्रेक्षकांना रहस्य, मानसिक उत्कंठावर्धक आणि मानवी भाव भावनांतील अनोखे नाट्य यांचा एकच वेळी रोमांचकारक अनुभव घेता येणार असून कथेतील प्रत्येक नाट्यमय घडामोडी पाहून प्रेक्षक थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.

'रेड रूम शो'मध्ये अभिनेत्री डेजी शाह तिया नामक तरुणीची भूमिका साकारत आहे. तर या माध्यमातून प्रेक्षकांना रहस्यमय दुनियेची सफर अनुभवता येणार आहे. जिथे पाहुण्यांच्या इच्छा पूर्ण केल्या जातात अशा एका अतिशय खास नाइटक्लबमध्ये तिया पोहोचते. परंतु, ही सुरुवातीला आनंददायक वाटणारी संध्याकाळ लवकरच फसवणूक आणि विश्वासघाताच्या धोकादायक खेळात बदलते. खोटेपणाच्या जाळ्यात अडकलेली तिया अचानक अडचणीत सापडते. शोच्या प्रत्येक भागात पुढची अनेक नवनवीन रहस्य उलगडत जातात आणि प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतात.

हंगामा डिजिटल मीडियाचे कार्यकारी निर्माते संजीव लांबा या शोबाबत म्हणाले की, “आम्ही सातत्याने स्वतःचे नाविन्यता आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करत असून रेड रूम हा शोदेखील त्याचाच एक भाग आहे. ही आकर्षक मालिका रहस्य, गुन्हेगारी आणि रोमांचक नाट्य यांचे एकत्रित मिश्रण असून याद्वारे नव्या काळातील प्रेक्षकांच्या सतत बदलणाऱ्या आवडी निवडी नक्कीच पूर्ण होतात. डेजी शाहच्या हंगामा मंचावरील ओटीटी पदार्पणातून आम्हाला खात्री वाटते की रेड रूम प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करेल आणि यशस्वी ठसा उमटवेल.”

'रेड रूममध्ये तियाच्या भूमिकेद्वारे ओटीटी पदार्पण करणारी अभिनेत्री डेज़ी शाह या शोबाबत म्हणाली की, “रेड रूम शोच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करणे हा माझ्यासाठी एक अप्रतिम अनुभव आहे. कथेत अनेक नाट्यमय घटना आणि वळणे असून प्रेक्षकांना याद्वारे माझ्यातील एक वेगळा पैलू पाहायला मिळेल. अशा बोल्ड कथानकात भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी हंगामाचे आभार मानते. कारण, यामुळेच मला कलाकार पठडीबाहेरील भूमिका साकारण्याचा, सीमारेषा ओलांडण्याचा अनुभव घेता आला.”

या शोविषयी अभिनेता अमित गौर म्हणाला की, “रेड रूमचा भाग होणे माझ्यासाठी एक रोमांचक प्रवास ठरला. कथानकातील तीव्र रहस्यमयता आणि मानसिक नाट्याने मला एक गुंतागुंतीची आणि अनिश्चित भूमिका साकारण्याची संधी दिली. डेज़ी शाह या शोद्वारे बहुप्रतीक्षित ओटीटी पदार्पण करत असून इतक्या प्रतिभावान कलाकारांसोबत काम करणे माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट होती. मला खात्री आहे की प्रेक्षकांना या मालिकेतील कथानक आणि भाव-भावनांच्या उसळणाऱ्या लाटा नक्कीच आवडतील.”

दरम्यान, 'रेड रूम शो हंगामा' ओटीटी मंचासह इतरही अनेक सहकारी ओटीटी मंचावर उपलब्ध असेल, जेणेकरून प्रेक्षकांना हा शो पाहता येईल. या मंचामध्ये 'टाटा प्ले बिंगे', 'प्ले बॉक्स टिव्ही पॉवर्ड बाय हंगामा', 'ॲनो नेट ब्रॉडबँड', 'एअर फायबर पॉवर्ड बाय हंगामा', 'मेगबेला', 'रेलवायर', 'बीएसएनएल सुपरस्टार', 'वॉचो आणि एसिटीव्ह फायबर नेट' यांचा समावेश आहे.

टॅग्स :बॉलिवूडडेझी शहासेलिब्रिटी