Join us

कोट्यावधींचा फ्लॅट अन् लग्झरी कार; लेकीच्या जन्मानंतर रणवीर-दीपिकाची आलिशान खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 9:19 AM

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रणवीर-दीपिकाने नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. 

Deepika-Ranveer Buys New Range Rover: रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone)  हे बॉलिवूडमध्ये चर्चेत असणारं कपल आहे. नुकतंच त्यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर ते दोघे आई-बाबा झाले आहेत. दीपिकाने गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ सप्टेंबर २०२४ रोजी मुलीला जन्म दिला.

अलिकडेच मुलगी घरात येताच दीपिकाने नवी मालमत्ता खरेदी केली आहे. एक दोन नाही तर 17.73 कोटींचा फ्लॅट दीपिकाने खरेदी केला आहे. त्यानंतर आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी नवी रेंज रोव्हर कार खरेदी केल्याचं पाहायला मिळतंय. 

मार्केटव्हॅल्यूनुसार या गाडीची किंमत जवळपास ४.७५ कोटी इतकी आहे. शिवाय गाडीची नंबर प्लेट रणवीर सिंगचा लकी नंबर आहे. सोशल मीडियावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. 

दीपिका पादुकोणच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची प्रभास व अमिताभ बच्चन यांच्यासह 'कल्की 2898 एडी'मध्ये झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवसर जबरदस्त कमाई केली. 'सिंघम अगेन' हा तिचा आगामी चित्रपट आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होईल.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगबॉलिवूडसेलिब्रिटी