Join us

बॅकग्राउंड डान्सर ते बॉलिवूडची आघाडीची नायिका; आज आहे कोट्यवधींची मालकीण; कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 4:25 PM

बॉलिवूडमध्ये प्रचंड संघर्ष करूनही अनेकांना पाहिजे तसा स्टारडम मिळत नाही.

Deepika Padukone:बॉलिवूडमध्ये प्रचंड संघर्ष करूनही अनेकांना पाहिजे तसा स्टारडम मिळत नाही. मनोरंजनाच्या झगमगत्या विश्वात फार मोजकेच टिकून राहतात.असं असतानाही पहिल्याच चित्रपटातून या अभिनेत्रीच्या फिल्मी करिअरला कलाटणी मिळाली.  सध्याच्या घडीला ही नायिका एका चित्रपटासाठी कोटींच्या घरात मानधन घेते. ही अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण आहे. 

दीपिकाने 'ओम शांती ओम' या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार झाली. आज बी टाऊनमधील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. दीपिकाने आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. परंतु, तिची 'ओम शांती ओम'मधली भूमिका विसरणं कोणालाही शक्य नाही. पण दीपिकाचा इथपर्यंतचा प्रवास फार काही सोपा नव्हता. 

बॅकग्राउंड डान्सर म्हणून केलं काम-

अगदी कमी लोकांनाच माहित असेल की अभिनेत्री दीपिका पादुकोण सिनेसृष्टीत येण्यापूर्वी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होती. प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर हिमेश रेशमियाच्या 'तेरा सुरूर' हा म्यूझिक अल्बम त्याकाळी प्रचंड हिट झाला. त्यामधील 'नाम है तेरा' या गाण्यामध्ये अभिनेत्रीने डान्स केला आहे. 

त्यानंतर फराह खान यांची नजर दीपिकावर पडली आणि त्यांनी 'ओम शांती ओम'साठी तिची निवड केली. २००७ मध्ये आलेल्या चित्रपटाने अभिनेत्रीला नवी ओळख मिळवून दिली. शिवाय दीपिकाने यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. 

आतापर्यंत दीपिकाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले. 'हाउसफुल', 'ये जवानी है दीवानी', 'चेन्नई एक्सप्रेस', 'राम-लीला', 'हैप्पी न्यू ईयर', 'पीकू', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'पठान', 'जवान' और 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. अलिकडेच अभिनेत्री दीपिका पादुकोण लग्नानंतर सहा वर्षांनी आई-बाबा झाले आहेत.  दीपिकाने गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ सप्टेंबर २०२४ रोजी मुलीला जन्म दिला. 

टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूडसेलिब्रिटीप्रेरणादायक गोष्टी