Mahie Gill : बॉलिवूडच्या ग्लॅमरस विश्वात एखाद्याचा निभाव लागणं फार मोठी गोष्ट असते. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही काहीच मोजकेच कलाकार आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री माही गिल (Mahie Gill). वेगवेगळ्या हिंदीसह पंजाबी चित्रपटांमध्ये काम करून ती नावारुपाला आली. बॉलिवूड सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी माही भारतीय लष्करातील नोकरी सोडली आणि अभिनयाची वाट धरली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.
अभिनेत्री माही गिलचा जन्म चंदीगढ येथे झाला. तिचे वडील एक सरकारी कर्मचारी होते तर आई कॉलेज लेक्चरर म्हणून काम करत होती. आपलं महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिने एनसीसीमध्ये सहभागी झाली. त्यानंतर तिने भारतीय लष्करात सिलेक्शन झाल्यानंतर माहीने बराच काळ ती सैन्यदलात सेवा दिली.
एका अपघातामुळे बदललं नशीब
एका मुलाखतीत माही गिलने लष्करी नोकरी सोडण्यामागचं कारण सांगितलं. त्यादरम्यान अभिनेत्रीने सांगितलं की, "चेन्नईमध्ये पॅरा सेलिंग ट्रेनिंगदरम्यान तिच्यासोबत एक अपघात घडला होता. त्यानंतर तिने अभिनयाची वाट धरली. भारतीय लष्करात असताना माझी फायरिंग कमांड उत्तम होती. जर मी लष्करी नोकरी सोडून आले नसते तर आज मी एका उच्च पदावर काम करताना दिसले असते. बऱ्याचदा प्रजासत्ताक दिनी मला बोलावण्यात यायचं. "असा खुलासाही अभिनेत्रीने केला होता.
लष्करी नोकरी सोडल्यानंतर अभिनेत्रीची माही गिलची पहिली भेट एका दिग्दर्शकासोबत झाली. त्याच वर्षी २००९ मध्ये अनुराग कश्यप यांच्या 'देव डी' मधून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'साहेब बीवी और गॅंगस्टर', 'दबंग' यांसारखे चित्रपट तसेच वेब सीरिजमध्ये तिने काम केलं आहे.