Divya Khossla Kumar : बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे अनेक कलाकार सापडतील ज्यांच्याकडे अभिनयाची कोणताही पार्श्वभूमी नसताना त्यांनी इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. या हिंदी सिनेसृष्टीत असे काही सेलेब्रिटी आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मोजकेच सिनेमे केले. पण रुपेरी पडद्यावर त्यांच्या सिनेमांची जादू काही चालली नाही. यातील एक नाव म्हणजे दिव्या खोसला कुमार (Divya Khossla Kumar) आहे. २००४ मध्ये आलेल्या 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' या चित्रपटामधून या अभिनेत्री इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.
अभिनेत्री दिव्या खोसला कुमार चाहत्यांमध्ये तिच्या चित्रपटांपेक्षा म्यूझिक अल्बममुळे प्रसिद्ध आहे. 'कभी यादों में आओ' या गाण्याने तिला नवी ओळख मिळवून दिली. अभिनेत्री तिच्या आजवरच्या सिनेकारकिर्दीत अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या समोर आली. परंतु ती अभिनय क्षेत्रात अपयशी ठरली. दिव्यानं 'रॉय', 'खानदानी सफाखाना', 'बाटला हाऊस', 'मरजावां', 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी', 'लुडो', 'इंदू की जवानी' आणि 'यारियां २' या चित्रपटांच दिग्दर्शन केलंय. आपल्या १९ वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत दिव्याचा एकही चित्रपट हिट झाला नाही.
एकामागोमाग फ्लॉप चित्रपट दिल्या दिव्याने अभिनयातून ब्रेक घेतला. २००५ मध्ये T-Series म्युझिक आणि फिल्म प्रोडक्शन कंपनीचे मालक भूषण कुमार यांच्याशी दिव्याने लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्री या क्षेत्रातून गायब झाली. परंतु बऱ्याच वर्षानंतर तिने इंडस्ट्रीत कमबॅक केलं. पण, तेव्हाही अभिनेत्रीला पाहिजे तसा स्टारडम मिळाला नाही.