Join us

ईशा देओलने गाजलेल्या 'बीडी जलाइले' गाण्याची ऑफर का नाकारली? अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:33 IST

ईशा देओलने 'ओमकारा' सिनेमातील 'बीडी जलाइले' गाण्याची ऑफर का नाकारली? कारण सांगत म्हणाली...

Esha Deol: दिग्गज बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल (Esha Deol)तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे. आजवर अभिनेत्रीने वेगवेगळ्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. सध्या ईशा देओल तिचा आगामी सिनेमा 'तुमको मेरी कसम' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. विक्रम भट यांच्या सिनेमातून ती पुन्हा मोठ्या पड्यावर कमबॅक करते आहे. 

सध्या ईशा देओल 'तुमको मेरी कसम' याच दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी ती मुलाखती देत आहे. याचनिमित्ताने अभिनेत्रीने आपण करिअरमध्ये काही महत्वाचे प्रोजेक्ट्स नाकारले यबद्दल अनेक खुलासे केले. २००६ साली आलेला 'गोलमाल: फन अनलिमिटेड' तसेच 'ओमकारा' चित्रपटातील 'बीडी जलाइले' आयटम सॉंग नाकारल्याचं तिने म्हटलं. पुढे बिपाशा बासूला या गाण्याची ऑफर देण्यात आली. शिवाय बिपाशाने या गाण्यामध्ये उत्तम परफॉर्मन्स दिला. असं म्हणत अभिनेत्रीने बिपाशाचं तोंडभरून कौतुक केलं. तसंच काही वैयक्तिक कारणामुळे आपण आपण ही ऑफर नाकारली. या गोष्टीचा आपल्याला आजही पश्चाताप होतो. असं देखील अभिनेत्रीने सांगितलं. 

दरम्यान, ईशा देओलला बऱ्याच वर्षांनी स्क्रीनवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विक्रम भट यांच्या 'तुमको मेरी कसम' मध्ये ईशा मुख्य भूमिकेत असून तिचा स्टायलिश लूक पाहायला मिळतोय.

टॅग्स :इशा देओलबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा