Rakumar Rao Maalik Movie: 'स्त्री-२' आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटांच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rakumar Rao) एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 'मालिक' या त्याच्या आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अगदी अलिकडेच राजकुमार रावच्या या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं त्यासोबतच रिलीज डेट जाहीर करण्यात आली. अशातच या चित्रपटापटाबद्दल महत्वाची समोर येत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी हिंदी सिनेसृष्टीत राजकुमार रावच्या या चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात आता या चित्रपटासोबत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटातील आयटम नंबरसाठी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीची निवड करण्यात आली आहे. हुमा कुरेशी 'मालिक'मध्ये आयटम सॉंग करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, राजकुमार रावची भूमिका असलेला 'मालिक' हा चित्रपट येत्या २० जुनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेता पहिल्यांदाच गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. 'मालिक'मध्ये राजकुमार रावसह अभिनेत्री मेधा शंकर, मानुृषी छिल्लर आणि ऋषी राज भसीन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा बहुचर्चित चित्रपत टिप्स फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असून पुलकित यांनी 'मालिक'च्या दिग्दर्शनाच्या धुरा सांभाळली आहे.