Join us

"...अन् मी प्रचंड घाबरले होते", जान्हवी कपूरने सांगितला 'नदियों पार' गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा रंजक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:39 IST

अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर 'रुही' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा शेअर केला आहे.

Janhvi Kapoor: 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण करुन अभिनेत्री जान्हवी कपूरने इंडस्ट्रीत स्वत: चं हक्काचं स्थान निर्माण केलं. जान्हवीने इंडस्ट्रीला आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. दरम्यान, जान्हवी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. राजकुमार राव स्टारर 'रुही' या सिनेमात तिने केलेल्या आयटम सॉंगची आजही तितकीच चर्चा होताना दिसते. अशातच या चित्रपटाला ४ वर्षे पूर्ण होताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'रुही' सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित झाला. दरम्यान, 'रुही' सिनेमाला ४ वर्षे पूर्ण होताच सोशल मीडियावर खास शब्दांत पोस्ट लिहून शेअर केली आहे. त्यादरम्यान, अभिनेत्रीने चित्रपटाच्या शूटिंगचे काही किस्से देखील चाहत्यांना सांगितले आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने किस्सा शेअर करत म्हटलंय, "रुही' चित्रपट आणि माझा पहिला सोलो डान्स नंबर असलेला 'नदियों पार' गाण्याला आज ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हा मी अगदी लहान मुलीप्रमाणेच होते. या गाण्याच्या शूटिंगवेळी मी प्रचंड घाबरले होते. त्यावेळी  लाईट्समोर डोळे उघडे ठेवून शूट करायचं असतं याबद्दल मला माहिती नव्हतं."

तीन दिवसांत शूट केलं पूर्ण

यानंतर पुढे जान्हवीने लिहिलंय, "'गुडलक जेरी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तीन दिवस या गाण्याची रिहर्सल केली.  पटियालामध्ये न झोपता जवळपास रात्रभर जागी राहून 'गुड लक जेरी'चं शूट पूर्ण केलं. मग सकाळी पॅकअप करून बाहेर आले. त्याच रात्री 'नदियों पार' गाण्याचं सात तासात शूट केलं. असं करत सलग तीन दिवस शूटिंग केलं होतं. हे सगळं एखाद्या मॅरेथॉनप्रमाणे सुरु होतं. परंतु काम केल्याचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता."

"सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे, या गाण्यासाठी माझा जो ड्रेस आहे तो एक दिवसात तयार करण्यात आला. मनीष मल्होत्रा यांच्या एका फोनने सगळं काही शक्य झालं. शिवाय केस, मेकअप, डान्स करताना परिधान केलेले कपडे यासाठी कतरिना कैफकडून प्रेरणा मिळाली." असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया