Join us

Aryan Khan Arrest updates: ड्रग्सविषयी जया बच्चन यांनी केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत; सोशल मीडियावर होतंय जोरदार ट्रोलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 17:36 IST

Aryan Khan Arrest updates: गेल्या दोन वर्षांमध्ये बॉलिवूड आणि ड्रग्स असं कनेक्शन अनेकदा समोर आलं आहे. एनसीबीने केलेल्या छाप्यामध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं उघड झाली आहेत.

ठळक मुद्देशनिवारी एनसीबीने मुंबईतील समुद्रात एका क्रुझवर छापा टाकला.

गेल्या दोन वर्षांमध्ये बॉलिवूड आणि ड्रग्स असं कनेक्शन अनेकदा समोर आलं आहे. एनसीबीने केलेल्या छाप्यामध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं उघड झाली आहेत. यामध्येच आता बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा लेक आर्यन खान याचं नाव समोर आलं आहे. शनिवारी एनसीबीने मुंबईतील समुद्रात एका क्रुझवर छापा टाकला. या छाप्यामध्ये क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये आर्यन खानदेखील असल्यामुळे कलाविश्वात एकच गोंधळ उडाला आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी यावर त्यांची मत दिली आहेत. परंतु, या सगळ्यामध्ये आता अभिनेत्री जया बच्चन चांगल्याच ट्रोल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणामध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आलं होतं. या प्रकरणात अनेक सेलिब्रिटींची नावही असल्याचं पाहायला मिळालं होतं. विशेष म्हणजे हे प्रकरण त्यावेळी गाजत असताना भाजपाचे खासदार रवि किशन यांनी लोकसभेमध्ये बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन यावर काही प्रश्न उपस्थित केले होते. “बॉलिवूड हा ड्रग्जचा अड्डा बनतोय त्यामुळे हे वेळीच थांबणे गरजेचं आहे,”असं रवि किशन म्हणाले होते. त्यांच्या या प्रश्नाव जया बच्चन चांगल्याच संतापल्या होत्या. 

Aryan Khan Arrest updates: आर्यनला सोडवण्यासाठी सतीश मान-शिंदे फ्रन्ट लाइनवर; एका दिवसासाठी घेतायेत इतकी फी

“बॉलिवूडशी संबंधित असलेले काही जण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात छिद्र करत आहेत, असा टोला जया बच्चन यांनी रवि किशन यांना लगावला होता. त्यातच आता ड्रग्स प्रकरणी आर्यन खानचं नाव समोर आल्यामुळे जया बच्चन यांनी नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारत ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

'जया बच्चन आता तुम्हीच सांगा नेमकं कोणाच्या ताटात छेद आहेत?', असं एका नेटकऱ्याने विचारलं आहे. तर 'शाहरुखच्या मुलाचं नाव समोर आल्यानंतर तुम्ही गप्प का?', 'शाहरुखच्या मुलाने केलेल्या गैरकृत्याला आता तुम्ही काय म्हणाल', असे असंख्य प्रश्न नेटकऱ्यांनी जया बच्चन यांनी विचारले आहेत. 

टॅग्स :मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीआर्यन खानजया बच्चन