Join us

'ही' बॉलिवूड अभिनेत्री पडली नीरज चोप्राच्या प्रेमात, म्हणाली- मला त्याचा साधेपणा आवडला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 6:12 PM

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राच्या चाहत्यांमध्ये बॉलिवूड सेलेब्सचाही समावेश आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारतीयांची मान उंचावणाऱ्या नीरज चोप्राच्या चाहत्यांमध्ये बॉलिवूड सेलेब्सचाही समावेश आहे. अनेक सेलेब्सकडून प्रत्यक्ष-अप्रयक्षरित्या नीरजचे कौतुक होत आहे. नीरजने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले तेव्हापासूनच त्याच्या विजयाची चर्चा सुरू आहे. आता नीरजच्या चाहत्यांच्या यादीत एक नवीन नाव जोडले गेले आहे.

अभिनेत्री पडली प्रेमात'क्लास ऑफ 2020'ची अभिनेत्री जोयिता चॅटर्जीने टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव केला. अभिनेत्री जोयिता चॅटर्जी म्हणाली की, ऑलिम्पिकमध्ये जिंकल्यानंतर मला नीरज चोप्राबद्दल कळले, त्यानंतर मी त्याला पाहू लागले. माझ्या ओळखीचे अनेक अभिनेते त्याचे कौतुक करत होते. मी कधीच विचार केला नव्हता की, मी त्याच्या प्रेमात पडेन.

नीरजचा साधेपणा आवडलाजोयिता पुढे म्हणाली की, जेव्हा मी नीरजचे व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली, तेव्हा मला जाणवले की त्याच्यामध्ये एक वेगळाच साधेपणा आहे. आयुष्यात खूप काही मिळवले असले, तरी पाय जमिनीवरच आहेत. तो कधीच मोठेपणा दाखवत नाही आणि मला नीरजचा हाच स्वभाव खूप आवडतो.

नीरज आदर्श व्यक्तीआजच्या काळात जिथे नात्यांना जास्त किंमत दिली जात नाही, तिथे नीरज सारख्या माणसाने माझे मन जिंकले. नीरजच्या नशिबात जी मुलगी येईल, ती खूप भाग्यवान असेल. मला इतर अभिनेत्रींप्रमाणे लग्झरी जीवन जगायचे नाही. मलाही नीरप्रमाणे एकदम साधे जीवन जगायचे आहे. नीरजमध्ये एका आदर्श व्यक्तीचे सर्व गुण आहेत आणि मलाही असाच व्यक्ती आयुष्याचा जोडीदार म्हणून हवाय, असंही ती म्हणाली. 

टॅग्स :नीरज चोप्राबॉलिवूड