Join us  

'दिलवाले'चा सेट अन्... चित्रपटाच्या शूटिंगवेळी काजोलने वाचवले होते शाहरुखचे प्राण; नेमकं काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 4:12 PM

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल ही रुपेरी पडद्यावरील लोकप्रिय जोडी आहे. सहकलाकार असूनही शाहरुख आणि काजोल खऱ्या आयुष्यात एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 

Shah Rukh Khan and Kajol Dilwale Movie:  बॉलिवूड अभिनेता शाहरुख आणि अभिनेत्री काजोल यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांची ऑनस्क्रिन केमेस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. २०१५ मध्ये आलेल्या 'दिलवाले' या हिंदी चित्रपटातून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आली. या चित्रपटाच्या कथानकासह शाहरुख-काजोलच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. पण, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहरुखचा काजोलने जीव वाचवला होता ्सं सांगण्यात येतं.

नेमकं काय घडलेलं?

'दिलवाले' या सिनेमाच्या माध्यमातून काजोल आणि शाहरुखची जोडी प्रेक्षकांच्या समोर आली. या चित्रपटात या दोघांबरोबरच वरूण धवन, क्रिती सनॉन यांसारखी स्टारकास्ट पाहायला मिळाली. दरम्यान, 'दिलवाले' मधील 'रंग दे तू मोहे गेरुआ' या गाण्याच्या शूटिंगवेळी एक घटना घडली. गाण्याचं शूटिंग करत असताना अचानक शाहरुख खानचं संतुलन बिघडल्यामुळे तोल जातो. मीडियारिपोर्टनुसार, काजोलच्या प्रसंगावधानाने शाहरुखचे प्राण वाचले. गाणं शूट करताना किगं खानचा तोल जातो त्याचवेळी हात पकडते. एका डोंगराळ भागात धबधब्याजवळ या गाण्याच्या शूटिंगचं ठिकाण होतं. त्यादरम्यान, काजोलने शाहरुखचा तोल जाताना त्याचा हात पकडला आणि त्याचे प्राण वाचवला, असं सांगण्यात येतंय.

याचा खुलासा खुद्द शाहरुख खानने एका मुलाखतीत केला होता. या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, "जर काजोलने योग्य वेळी माझा हात पकडला नसता तर मी धबधब्यात कोसळलो असतो". असं अभिनेत्याने सांगितलं.

पाहायला गेल्यास शाहरुख आणि काजोलने 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' तसेच 'कुछ कुछ होता हैं' यांसारखे सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. 

टॅग्स :शाहरुख खानकाजोलबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी