Join us  

Tanu Weds Manu-3 : कंगना राणौत-आर माधवनची जोडी पुन्हा एकत्र येणार? कहाणीमध्ये आहे मोठा ट्विस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 3:47 PM

'तनु वेड्स मनु' ही बॉलिवूड सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या फ्रॅंचाइजीपैकी एक आहे.

Tanu Weds Manu -3 : 'तनु वेड्स मनु' ही बॉलिवूड सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या फ्रॅंचाईजी पैकी एक आहे. पहिले दोन भाग यशस्वी झाल्यानंतर दिग्दर्शक आनंद एल राय यांनी चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचं स्क्रिप्ट पूर्ण केलं आहे. पण, या चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 'तनु वेड्स मनु- ३' या चित्रपटामध्ये अभिनेत्री कंगणा राणौत ट्रिपल रोलमध्ये पाहायला मिळणार आहे. रोमान्स आणि कॉमेडीने परिपूर्ण असलेला हा चित्रपट २०२६ पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'पिंकविलाच्या' रिपोर्टनुसार, लेखक हिमांशु शर्मा यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट तयार केली आहे. असं सांगण्यात येतंय की, तनु वेड्स मनु च्या तिसऱ्या भागाची कहाणी दुसरा भाग जिथे संपला तिथून सुरू होणार आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. शिवाय जुलै २०२५ पासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होईल.

कंगना दिसणार ट्रिपल रोलमध्ये-

चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेत्रा कंगणा राणौतने तनुची भुमिका साकारली होती. तर, दुसऱ्या भागात अभिनेत्री दुहेरी भूमिकेत पाहायला मिळाली. आता ;तनु वेड्स मनु; च्या तिसऱ्या पार्टमध्ये कंगणा ट्रिपल रोलमध्ये पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येतंय.

सध्या  दिग्दर्शक आनंद एल राय एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं कळतंय. २०११ मध्ये आलेल्या 'तनु वेड्स मनु' चित्रपटाचा सीक्वल २०२५ मध्ये आला. त्यानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच  भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. 

टॅग्स :कंगना राणौतआर.माधवनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा